पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ आणि निर्माण झालेला तुटवडा याच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप काळामध्ये देशातील व्यवस्था विस्कळीत झाली असून याला केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे. पाच राज्यांच्या निवडणुका नंतर आता दरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचे नियोजन अगोदरच करायला हवे होते. गेल्या 14 वर्षापासून सर्वसामान्य जनता अच्छे दिन ची वाट पाहत आहे. पेट्रोल डिझेल मिळतच नाही मग वाचवायचे काय? भाजपला पाठिंबा देणारे घटक आणि मतदान करणारे नागरिकांची तोंडं आता बंद का आहेत? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला.