Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : “सत्तेत असताना महिला आरक्षण विधेयक फाडले..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा

श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत, सत्तेत असताना महिला आरक्षण विधेयक फाडल्याचा आरोप केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 06:30 PM
"सत्तेत असताना महिला आरक्षण विधेयक फाडले..", डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा

"सत्तेत असताना महिला आरक्षण विधेयक फाडले..", डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा
  • मतदार संघ पुनर्रचनेवरुन विरोधकांचा उत्तर-दक्षिण भेदभाव करण्याचा डाव
  • महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे होते,
नवी दिल्ली : तब्बल ३० वर्ष रखडलेल्या महिला आरक्षणाला काँग्रेसनेच विरोध केला होता. आरक्षणाला विरोध करताना काँग्रेस नेत्यांनी विधेयक फाडले होते, असा निशाणा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर साधला. महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे होते, मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक वर्ष काँग्रेसची राजकारण करण्यात गेली, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार नरेश म्हस्के आणि महाराष्ट्रातून आलेल्या महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर

खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेसमुळे ३० वर्ष रखडलेल्या महिला आरक्षणाला सत्यात उतरवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. हा कायदा वर्ष २०२३ मध्ये हा कायदा सभागृहात सर्वानुमते पारित झाला होता. विधेयक जेव्हा पास होते तेव्हा ते फक्त लागू करायचेच असते. सरकारने काल अध्यादेश काढून लागू केलं, त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महिलांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सरकारने अध्यादेश काढून दाखवून दिले, असे ते म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की संसेदत सादर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. या विधेयकाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी त्यांच्या मतदार संघातून १० महिलांना दिल्लीत आणले. महाराष्ट्रातून आलेल्या या महिलांनी सभागृहात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला, असे ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल, त्यांना समान संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा हेतू शुद्ध आहे. लाडक्या बहिणी पुढे कशा येतील, यासाठी आम्ही काम करतोय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच महाराष्ट्रात लाडकी बहिण सारखी मोठी योजना लागू केली. लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांवर आणि सरकारवर भरभरुन प्रेम केलं, असे ते म्हणाले.

मतदार संघ पुनर्रचनेवर विरोधकांकडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. मतदार संघ पुनर्रचनेचा फॉर्म्युला काय असेल, हे गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात सांगितले. पुनर्रचनेनंतर कुठल्याही जागा कमी होणार नाहीत, मात्र यावर विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

शिवसेना नेतृत्वाने यापूर्वीच पक्षांतर्गत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की शिवसेना पक्षाने यापूर्वीच विधान परिषदेत आणि राज्यसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे काम केले. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी डॉ. ज्योती वाघमारे यांना संधी दिली. विधान परिषदेत डॉ. निलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे, भावना गवळी या शिवसेनेच्या आमदार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन

Web Title: Shrikant shinde criticizes congress women reservation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा
1

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा
2

राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
3

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.