Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय…

मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सात खासदारांशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात होता. खासदार संजय राऊत यांनी या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत पक्ष एकसंघ, मजबूत मजबूत आणि सक्षम असल्याचा दावा केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 08:29 AM
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय...

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय...

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यापैकी ४ खासदार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. तर इतर दोघे बुधवारी सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचणार आहेत, अशी माहिती सध्या समोर आली आहे.

ठाकरे गटाचे हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन वेगळा गट स्थापन करणार आहेत. त्यानंतर हा गट शिवसेनेत विलीन होईल, अशी रणनीती आहे. दरम्यान, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीत दाखल झाले. मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सात खासदारांशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात होता. खासदार संजय राऊत यांनी या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत पक्ष एकसंघ, मजबूत मजबूत आणि सक्षम असल्याचा दावा केला होता.

या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ९ खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ४ खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर ५ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ च्या शक्यतांना बळ मिळाले.

उद्धव ठाकरे यांचे शिलेदारही दिल्लीत

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झाले आहेत. सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यास त्यांची खासदारकी कशी रद्द करता येईल, त्यासाठी कोर्टाचे दार ठोठवयाचे झाल्यास काय करता येईल, याबाबत कायदेतज्ज्ञांची चर्चा केल्याचे कळते.

चार्टर विमानाने दिल्लीत

उद्धव ठाकरे यांच्या खासदारांना दिल्लीला जाण्यासाठी चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानातून चौघेजण रवाना झाल्याचे कळते. दोन खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात होते. तर संजय दिना पाटील मुंबईत होते. ते पहाटे दिल्लीला निघतील, असे वृत्त आहे.

वेगळा गट स्थापन करणार

राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटाकडे लोकसभेत सध्या नऊ खासदार आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजे सात खासदारांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे ‘सात खासदार’ हा आकडा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सध्या उद्धव यांचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार का, असा सवाल करण्यात येत आहे. ९ पैकी ६ खासदार असले तरी वेगळा गट स्थापन करता येऊ शकतो, असा काही कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

हे खासदार फुटणार?

– संजय जाधव
– संजय देशमुख
– भाऊसाहेब वाकचौरे
– ओमराजे निंबाळकर
– नागेश पाटील-आष्टीकर
– संजय दीना पाटील

‘ऑपरेशन टायगर’वर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘ठाकरे गटात घुसमट होत असल्याने खासदार, आमदार…’

Web Title: Six mps from the thackeray group are in delhi with eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
2

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
3

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
4

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.