Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का! आदित्य फत्तेपूरकरांचा उमेदवारी अर्ज बाद

काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचकानेच ऐनवेळी सही नाकारल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 02, 2026 | 09:43 PM
Solapur Vidhan Parishad election, Congress, Aaditya fattepurkar, Solapur news,

Solapur Vidhan Parishad election, Congress, Aaditya fattepurkar, Solapur news,

Follow Us
Follow Us:

सोलापूर शहर प्रतिनिधी : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ घडली. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचकानेच ऐनवेळी सही नाकारल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांवरील हरकतींच्या सुनावणीदरम्यान ही नाट्यमय घटना घडली. फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही करणारे पंढरपूर नगरपरिषदेचे सदस्य नागेश भोसले यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कार्तिकेयन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन देत, उमेदवारी अर्जावरील सूचकाची सही माझी नसल्याचा दावा केला.

निवडणूक नियमांनुसार सूचकाने सही नाकारल्यास अथवा माघार घेतल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे छाननीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला.

दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण वातावरण

सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतः उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदविली. त्यामुळे कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला

खासदार प्रणिती शिंदे यांचा संताप

सूचकाने सही नाकारल्याची माहिती मिळताच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका केली. “हा लोकशाहीला ठार करण्याचा प्रयत्न आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

भाजपचा मार्ग सुकर?

काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर हे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासमोर सक्षम आणि तगडे आव्हान मानले जात होते. मात्र उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

धैर्यशील कदम यांचा दमदार उमेदवारी अर्ज, भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीची रणशिंग

Web Title: Solapur vidhan parishad election candidate from congress aaditya fattepurkars application got rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Congress
  • Solapur News
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”
1

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”

धैर्यशील कदम यांचा दमदार उमेदवारी अर्ज, भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीची रणशिंग
2

धैर्यशील कदम यांचा दमदार उमेदवारी अर्ज, भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीची रणशिंग

करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू
3

करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका; अंगावर भिंत कोसळून वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ला आयुक्त डॉ. ओम्बासेंची पायी वाटचाल, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना दिला प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा संदेश
4

सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ला आयुक्त डॉ. ओम्बासेंची पायी वाटचाल, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना दिला प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.