:.... तर हा मला मारण्याचाच कट होता"; सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप
राहाता प्रतिनिधी :धांदरफळ येथील सभेनंतर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि राहाता तालुक्यातील महायुतीच्या सभेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र थोरातांच्या दहशतीच्या प्रवृत्तीवर कठोर टिका विखे पाटकांनी कडव्या शब्दांत टीका केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर, रविवारी दुपारी ३ वाजता संगमनेरात निषेध मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता. थोरात समर्थकांनी उपस्थित असलेल्या महायुती कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोरातांनी दहशतीचे खरे दर्शन राज्याला घडविले आहे. तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांवर असाच अन्याय कराल तर तुमची दहशत मोडून काढण्यासाठी जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
हेही वाचा-“महायुती व जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर विजय संपादन करू”; शेखर निकम यांचं वक्तव्य
सुरज विखे पुढे म्हणाले की, सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तातडीने निषेध केला. त्या वक्तव्याचे समर्थनही होऊ शकत नाही. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून आमच्या अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर, आम्हीही सहन करणार नाही. तालुक्यात सभांना मिळणा-या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय तयारीने माझ्यावरच हल्ल्याचा कट केला होता. सभा सुरु असतानाच याची माहीती मला मिळाली. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक उद्रेक होवू नये म्हणून मी कार्यकर्त्यांसहीत तेथून बाहेर पडलो. मात्र रस्त्यात ठिकठिकाणी थांबलेल्या थोरात समर्थकांनी महिला आणि कार्यकर्ते बसले असलेल्या गाड्या नियोजन बध्द पध्दतीने अडवून तोडफोड केली.
गाड्या जाळण्यासाठीचे साहित्य त्यांच्याकडे तयारच असल्याने गाड्याही पेटविण्यात आल्या. या सर्व गोष्टी अचानक होऊ शकत नाही त्यामुळेच हे ठरवून केलेले षडयंत्र असल्याचा आरोप विखेंनी आपल्या भाषणात केला. संगमनेरमधील दहशत राहाता तालुक्यातील जनता सहन करणार नाही. तुम्हालाही जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची आहे. असं सुजय विखे पाटील यांनी कठोर शब्दांत सांगितलं आहे.
हेही वाचा-“स्वत:च्या भावाला पक्षात ठेवून न्याय देऊ शकले नाहीत”; संदेश पारकर यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
पुढे विखे असंही म्हणाले की, हल्ला झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे. तालुक्यातील ही दहशत संपविण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असं , डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांवर हल्ला करणा-यांवर आधिच कारवाई होण्याची गरज होती. मात्र याचे गांभीर्य प्रशासनाने दाखविले नाही. नाईलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कालच्या घटनेचे गांभीर्य निवडणूक आयोगानेही घ्यावे. याचे सविस्तर निवेदन आम्ही आयोगाकडे देणार असल्याची माहीती विखेंनी भाषणात दिली. सुजय विखे पाटलांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात उपस्थित कार्यकर्त्यांनी तिव्र शब्दात निषेध केला. लोणी बुद्रूक येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत सदर घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे.