Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिले PM मोदींना मुलीच्या लग्नाची दिली पत्रिका, मग Supriya Sule नी साधला पेट्रोल-डिझेलवरून निशाणा

सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना आपली मुलगी रेवतीच्या लग्नाचे आमंत्रण दिले, पण त्यानंतर लगेचच त्यांनी वाढत्या इंधन दरांवरून आणि युरियाच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 26, 2026 | 01:58 PM
सुप्रिया सुळेंचे वेगळेच राजकारण (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

सुप्रिया सुळेंचे वेगळेच राजकारण (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुलीच्या लग्नासाठी सुप्रिया सुळेने दिले पंतप्रधानांना आमंत्रण 
  • पेट्रोल डिझेलवरून दुसऱ्या बाजूने हल्लाबोल
  • केंद्र सरकारवर साधला निशाणा 
शरद पवार यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आपली मुलगी रेवती सुळेच्या लग्नाचे आमंत्रण दिले. यावेळी त्यांचे होणारे व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानी हेही उपस्थित होते. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण अवघ्या २४ तासांनंतर सुप्रिया सुळे यांचा सूर पूर्णपणे बदलला असल्याचेही दिसून आले. 

एका बाजूला मुलीच्या लग्नाचे आमंत्रण सविस्तर दिले आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांनी सोमवारी त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींसोबतच्या भावनिक आणि कौटुंबिक भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वाढत्या इंधन दरांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, देश सध्या एका संघर्षात अडकला असून संकटातून जात आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून सरकारवर हल्लाबोल 

लाईव्ह |📍मुंबई ⏭️ 25-05-2026 पत्रकारांशी संवाद https://t.co/omXjPkQrRw — Supriya Sule (@supriya_sule) May 25, 2026

गेल्या ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, “आम्ही यावर सातत्याने चर्चा करत आहोत.” राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीने संसदेत या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवला आहे. एका बाजूला आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देऊन दुसऱ्या बाजूला मात्र सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केला असल्याचं दिसून आलं आहे. 

Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई

महागाईमुळे शेतकऱ्यांवर संकट

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सामान्य लोक पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगेत उभे आहेत. शेतकऱ्यांची अवस्थाही तशीच झाली आहे. मंत्री युरिया मिळणार नाही असा दावा करत आहेत, मग या समस्या कशा सुटणार? महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये आणि महागाई वाढत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. कोणीही कशाचेही प्रदर्शन करू शकतो, पण पैसा किंवा धान्याचे प्रदर्शन करता येत नाही. त्यांनी हेही स्पष्ट केले की, एक राष्ट्रीय संकट निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र सरकारवरही निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची वक्तव्ये परस्परविरोधी असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. देशात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत, तर छगन भुजबळ यांच्या मते हा साठा केवळ ३० दिवसांपुरता आहे. सरकारने नेमके काय नियोजन केले आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात सरकार सत्य का सांगत नाहीये, असा प्रश्न तिने विचारला.

सारंग लखानी कोण आहेत?

सुप्रिया सुळे यांची मुलगी, रेवती सुळे, हिचा साखरपुडा नागपूरच्या प्रसिद्ध विश्वराज ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी झाला आहे. सारंग लखानी हे गेल्या आठ वर्षांपासून विश्वराज ग्रुपमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मॉडर्न हायड्रोजनमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून काम केले होते

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?

Web Title: Supriya sule invited pm modi for daughter revati wedding then attack bjp government for petrol diesel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • PM Modi
  • political news
  • supriya sule

संबंधित बातम्या

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
1

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.