Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. पक्षांतर कायद्यानुसार हे खासदार अपात्र ठरू शकतात, असे सांगत लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 09:16 PM
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंड करत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर पक्षांतर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा दावा केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे दोन खासदार काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आले. यावेळी पक्षांतरविरोधी कायद्याशी संबंधित तरतुदी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘दोन तृतीयांश संख्या झाली तरी पक्षांतर आपोआप वैध होत नाही’

सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या सहा खासदार गेल्यामुळे दोन तृतीयांश संख्या पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र केवळ दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले म्हणून पक्षांतर आपोआप वैध ठरत नाही.”

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

त्यांच्या मते, पक्षांतरविरोधी कायद्यानुसार केवळ सदस्यांची संख्या पुरेशी नसून मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या प्रक्रियेचा आधार घेतच लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

ओमराजे निंबाळकरांवरही निशाणा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली. “सहा जणांचा आकडा पूर्ण होईपर्यंत त्यांनी थांबून नंतरच निर्णय घेतला,” असा आरोप करत त्यांनी बंडखोरी पूर्वनियोजित असल्याचा दावा केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

उद्धव ठाकरे म्हणाले, “ते खासदार फुटू शकत नाहीत. कारण कायदा असं सांगतो, जरी दोन तृतीयांश खासदार इकडचे तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाहीत. पक्षात विलीन होऊ शकत नाहीत. कारण पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो. आणि त्याला खासदारांनी दोन तृतीयांश पाठिंबा द्यावा लागतो. आता पाहुयात ओम बिर्ला काय करतायेत,” असे ते म्हणाले.

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

बंडखोर खासदारांविरोधात अपात्रतेची मागणी करण्यात आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uddhav thackeray claims rebel mps may face disqualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.