Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ… आता कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

धाराशिव दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. 'गद्दार' हा शिक्का कधी पुसणार, असा सवाल करत त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही अनेक राजकीय दावे केले.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 07:41 PM
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ... आता कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ... आता कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत ओमराजे निंबाळकर यांना “गद्दार” म्हणत जोरदार टीका केली.
  • भाजपमध्ये “ऑपरेशन देवेंद्र” सुरू असल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे राजकीय वक्तव्य केले.
  • संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर विविध आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करत चौकशीची मागणी केली.
 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याअंतर्गत धाराशिवमध्ये आयोजित सभेत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली.

“उद्धव ठाकरे फिरत नाहीत म्हणणाऱ्यांनी आता महाराष्ट्र पाहावा. या सभा नसून माझ्या कौटुंबिक बैठका आहेत. कितीही आमदार-खासदार फोडले तरी तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही,” असे ठाकरे म्हणाले.

‘खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ’चा उल्लेख करत विचारला जळजळीत सवाल

लोकसभा निवडणुकीतील एका प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, एका गरीब शेतकऱ्याने बंडखोर खासदाराच्या प्रचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्या खासदाराने जनतेशी संपर्क ठेवला नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘शिंदे राम तर फडणवीस लक्ष्मण’; खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी

‘गद्दार’ शिक्का कधी पुसणार?

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. “खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची उदाहरणं देणारे तुम्हीच होता. आता तुमच्या कपाळावर लागलेला ‘गद्दार’ हा शिक्का कधी पुसणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणशैलीची नक्कल करत, “मी त्यांना वाघ समजलो होतो, पण ते वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे निघाले,” अशी टीकाही केली.

‘ऑपरेशन देवेंद्र’चा दावा; फडणवीसांबाबतही मोठं वक्तव्य

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचा दावा केला. “हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र आहे,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही भाष्य केले.

त्यांनी दावा केला की, भविष्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकणाऱ्या नेत्यांना रोखण्यासाठीच काही राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या संदर्भातील दाव्यांना कोणतेही अधिकृत पुष्टीकरण उपलब्ध नाही.

कैलास पाटील यांची उद्धव ठाकरेंना साथ

सभेत आमदार कैलास पाटील यांनी, “काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिकांसोबत राहीन,” अशी भूमिका मांडली.

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

संजय राऊतांचे गंभीर आरोप

सभेत खासदार संजय राऊत यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी निंबाळकर यांच्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच विविध कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत ते शिंदे गटात गेले असल्याचा दावा केला.

राऊत यावेळी म्हणाले, “हा भामटा का गेला? कारण त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. आता मला असेही वाटत आहे कि त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे. त्या खुनामागेदेखील वेगळं काहीतरी रहस्य आहे. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट अक्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला. हा घाबरून शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसे खाल्ले, असे अनेक गुन्हे केले म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेला. 15-20 वर्ष एका सापाला दूध पाजले होते पण आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली आहे,” असे राऊत म्हणाले.

Web Title: Uddhav thackeray slams omraje nimbalkar dharashiv operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
1

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
2

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
3

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.