Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Sanjay Raut : मोदी स्वत:ला नॉनबायोलॉजिकल म्हणवतात. मग जे आईच्या गर्भातून आलेले नाहीत ते शाळेत कसे जातील, चहा कसे विकतील. मोदी ज्या स्टेशनचा उल्लेख करतात त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्त्वातच नव्हते.' असही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 01:42 PM
Sanjay Raut Challenge BJP, Devendra Fadnavis Sanjay Raut, Shiv Sena UBT News,

Sanjay Raut Challenge BJP, Devendra Fadnavis Sanjay Raut, Shiv Sena UBT News,

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी चहा विकल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडण्याची घोषणा.
  • १९७१ च्या काळात मोदींनी नमूद केलेले रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नसल्याचा दावा.
  • फडणवीस हे खोटा प्रचार करत असून सूडाचे व भेदभावाचे राजकारण करत असल्याचा आरोप.
Sanjay Raut Slams Narendra Modi:  “ज्या काळात नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हते. प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता. मग मोदींनी चहा कुठे विकला?” असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशामा साधला आहे. इतकेच नव्हे तर, नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन,” असे खुले आव्हान राऊत यांनी दिले आहे.

महिला आरक्षण विधेयक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चहावाला’ प्रवास, रॅपिडोमुळे संकटात आलेले रिक्षाचालक, अमरावती रुग्णालयातील दुर्घटना आणि शाळांच्या आंदोलनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील घडामोडींचा अभ्यास करून वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची

संजय राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी ज्या काळात ज्या रेल्वेस्टेशनवर चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्त्वातच नव्हते, १९७१ सालच्या आसपास ते गुजरातमध्ये ते रेल्वेस्टेशन अस्तित्त्वात नव्हते. त्यांनी चहावगैरे विकला नाही. देवेंद्र फडणवीस परत खोटे बोलत आहेत. मोदींनी लहानपणी चहा विकला नाही. कुणी मला मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारणच सोडेन, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

मोदी स्वत:ला नॉनबायोलॉजिकल म्हणवतात. मग जे आईच्या गर्भातून आलेले नाहीत ते शाळेत कसे जातील, चहा कसे विकतील. मोदी ज्या स्टेशनचा उल्लेख करतात त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्त्वातच नव्हते.’ असही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

या देशातील अनेक राज्यकर्ते सामान्य कुटुबातून आले आहेत. आपण नगरसेवक होऊ, मुख्यमंत्री होऊ असे कधीही मला वाटले नव्हते, असे फडणवीस म्हणत असतील तर त्यांनी सदैव या महाराष्ट्राचे कायम आभारी असायला हवे. पण तुम्ही या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालात. धर्मा-धर्मात, जातीत भेद करायला निघालात, खोटं बोलत आहा, सुडाने, द्वेषाने वागत आहात, जो माणूस समान्य घरातून जन्माला येतो तो असे वागत नाही, असा टोलाही संजय राऊतांनी फडणवीस यांना लगावला.

Bank Strike Alert : बँकेची कामं अडकणार… कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, कधीपर्यंत बंद राहणार सर्व्हिस?

‘महिला आरक्षण विधेयक पुन्हा कसं आणणार?’

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊतांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. 2023 मध्ये संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील संविधान (106वी दुरुस्ती) अधिनियम मंजूर झाला होता. या कायद्यात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाची तरतूद करण्यात आली; मात्र त्याची अंमलबजावणी जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) जोडण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राऊतांनी फडणवीस यांच्या 2023 मधील भूमिकेचा संदर्भ देत सवाल केला. “2023 सालचे विधेयक पुन्हा आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? एकच विधेयक दोनदा कसे जाहीर होणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विधेयकाच्या अंमलबजावणीऐवजी त्यात डिलिमिटेशनचा मुद्दा जोडला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर महिला आरक्षणाच्या भूमिकेवरून टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याचा त्यांचा आरोप आहे.

रॅपिडोमुळे रिक्षाचालक संकटात; सरनाईकांना पत्र

रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅप-आधारित प्रवासी सेवांमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा राऊतांनी उपस्थित केला. “ आपल्या राज्यात हजारो रिक्षाचालक मराठी आहेत. ज्यांना कधीही नगरसेवक किंवा मुख्यमंत्री होता येणार नाही, असे हजारो मराठी रिक्षाचालक आहेत. अशा रिक्षाचालकांचे रॅपिडो बाईक रिक्षामुळे व्यवसाय संकटात आले आहेत, तेही मराठीच आहेत ना. या प्रकरणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिल्याचे सांगितले. रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच अशा सेवांना परवानगी देण्याची भूमिका राऊतांनी मांडली आहे.

 

Web Title: Politicssanjay raut challenges pm narendra modi chaiwala claim press conference mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
1

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
2

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
3

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.