महायुतीच्या सरकारमधील पश्चिम महारष्ट्रातील पालकमंत्र्यांची नावं समोर आली आहेत (फोटो - सोशल मीडिया)
सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली असून महायुतीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपवरुन जोरदार राजकारण रंगले. तसेच काही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच दिसून आली. यानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर बरेच दिवस रखडून पडलेल्या पालकमंत्र्यांच्या निवडी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशकार्यकारिणीने जाहीर केल्या. अपेक्षेप्रमाणे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराजे यांना सांगली तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या पालकमंत्री निवडीवर भाजपचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली मात्र जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच इतर कार्यकारणी सदस्य आणि पालकमंत्री यांच्या निवडी मात्र प्रलंबित होत्या. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मोक्याचे जिल्हे ताब्यात घेण्यासाठी जोरदार चुरस होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत राजकीय चाणाक्षपणे हा मुद्दा सोयीस्करपणे कसा सुटेल यासाठी या पालकमंत्री पदाच्या नेमणुका प्रलंबित ठेवल्या होत्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रदेश कार्यकारिणीने शुक्रवारी पालकमंत्री पदाच्या नेमणुका जाहीर केल्या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला वर चष्मा कायम ठेवला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच पालकमंत्री असावेत असा आग्रह काही दिवसापूर्वी धरला होता. तसेच बाबाराजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाचा पदभार देण्यात आला आहे. नैसर्गिकरित्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी बाबाराजेंकडेच असावी असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. त्या पद्धतीने अपेक्षेप्रमाणे बाबाराजे यांची साताऱ्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला चेकमेट करण्यासाठी ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्रीची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन मंत्री शंभूराजे हे सातारा जिल्ह्यासाठी आग्रही होते त्यांना पालकमंत्री पदाचा कामाचा अनुभव सुद्धा होता मात्र भाजपने आपला पालकमंत्री पदांसाठी कारभारी देताना पक्ष समन्वय, संघटन बांधणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड ठेवण्याच्या दृष्टीने या निवडी राजकीय संदर्भाने केल्या आहेत.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे पालक मंत्री या नात्याने सातारा जिल्ह्याच्या विकासाची व राजकीय नेतृत्वाची व पक्ष बांधणी मजबूत ठेवण्याची जवाबदारी आली आहे . त्यामुळे शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगलीतील राष्ट्रवादी च्या ताकतीला शह देण्यासाठी पालकमंत्री पद देण्यात आले आहे . शिवेंद्रसिंह राजे यांच्या साताऱ्याच्या पालकमंत्री पदामुळे बाबाराजे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .