सीएम देवेंद्र फडणवीस चित्रपट भूमिका प्रसाद ओकने करावी अशी इच्छा व्यक्त केली (फोटो - सोशल मीडिया)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये नाटक की सिनेमा याबाबत मत मांडले. फडणवीस म्हणाले की, “अलिकडच्या काळामध्ये फार काही नाटक बघायला वेळ मिळत नाही. मी नाटकं बघतो आहे फक्त ती कलाकारांची नाही. मी राजकारणातील नाटक बघतो सुद्धा आहे आणि करतो सुद्धा आहे. आता काय सांगू? पूर्वी खूप नाटक बघत होतो. त्यावेळी आवडलेले एक नाटक म्हणजे सही रे सही. म्हणजे मी फार गंभीर माणूस नाही. मला हलक फुलक आवडतं, त्यामुळे मला सही रे सही हे नाटक खूप आवडलं होतं. ते माझ्या मनामध्ये नेहमी असतं. आणि अजूनही पाहण्याची माझी इच्छा होते,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
पुढे फडणवीस म्हणाले की, “लहान असताना मला नाटक पाहण्याची आवड निर्माण झाली कारण मी तो मी नव्हेच हे नाटक मी पाहिलं होतं. ते समजण्याचं माझं वय सुद्धा नव्हतं पण ते मला इतकं आवडलं होतं की तेव्हापासून मी मराठी नाटक बघू लागलो. खूप नाटक त्यानंतर पाहिली. राजकारणतही नाटकं पाहिली आणि आता त्यांना याबाबत विचारलं तर ते म्हणतात की तो मी नव्हेच,” असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार
एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या चित्रपटाबाबत देखील विचारण्यात आले. फडणवीसांनी त्यांच्या चित्रपटाबाबत इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझा कधी सिनेमा आला तर त्यामध्ये अभिनेता प्रसाद ओक माझी भूमिका योग्यपणे करु शकतात. त्यामुळे या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. यापूर्वी शिवसेनेतील राजकारण आणि आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यात आला आहे. धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांची भूमिका देखील अभिनेता प्रसाद ओकने निभावली. अत्यंत गाजलेल्या या चित्रपटातील प्रसाद ओकच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांची भूमिका प्रसाद ओकने करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.






