फोटो सौजन्य - Social Media
राज्यात २० नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडला. राज्यात ठिकठिकाणी निवडणुका झाल्या. मोठ्या संख्येंनी उमेदवारांनी एकत्र येत आपला मतदानाचा हक्क बजावला. आज या निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीने या निवडणुकीला गाजवत विजयध्वज मिरवला. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता गाजवण्यासाठी महायुती सज्ज आहे. अनेक योजनांची आणि वाचनाच्या पूर्ततेची वाट मतदार बंधू पाहत आहेत. तसेच त्या वचनांची पूर्तता लवकरच होईल अशी आशा मतदार बंधूंना आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर विजयाचा हर्ष दिसून आला आहे. त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया तर दिलीच आहे. त्याचबरोबर मुलगी दिविजा फडणवीसनेही वडिलांच्या या पराक्रमावर भाष्य केले आहे.
दिविजाने वडील देवेंद्र फडणवीस यांच्या विजयावर भाष्य करताना तिने आनंद जाहीर केला आहे. तसेच जनतेचे आभार मानले आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानत तिने जनतेला विकासाचा विश्वास दिला आहे. तसेच असेच प्रेम आणि पाठिंबा देण्याचे आवाहन जनतेला केले आहे. एकंदरीत, माध्यमांशी संवाद साधताना दिविजा म्हणते कि,” मी खूप आनंदी आहे. आम्हाला एवढा पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमचा पाठिंबा आमच्याशी लाख मोलाचा आहे. कृपया असाच पाठिंबा देत राहा. आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र महान करण्यासाठी भाजप कोणतीही कसर ठेवणार नाही.” भारतीय जनता पक्ष राज्यसाठी आणि राज्याच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिविजाने दिला आहे.
जाणून घ्या दिविजा फडणवीसबद्दल
सुंत्रांच्या अहवालानुसार, मुंबईच्या फोर्ट येथील कॅथेड्रल स्कूलमधून शालेय शिक्षण घेत दिविजाने आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. दरम्यान, वर्ष निवासस्थानी राहणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तींपैकी ती एक आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये फारशी सक्रिय नसणारी दिविजा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 47 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या पोस्ट्सवरून तिच्या आईप्रमाणेच तीही आध्यात्मिक असल्याचे स्पष्ट होते. तिच्या अकाउंटवरील छायाचित्रांमधून हे वारंवार दिसून येते. राजकीय प्रश्नांवर तिची स्पष्ट मते आणि विचार व्यक्त करण्याच्या तिच्या शैलीमुळे ती वारंवार चर्चेत राहते.
दिविजा भविष्यात राजकारणात दिसून येणार?
राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस भविष्यात राजकारणात दिसून येणार का? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. गेल्या काही दिवसात दिविजा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारणातील विषयावर आपले मत मांडत आहे. यामुळे भविष्यात तिच्या राजकरणात येण्याच्या चर्चेला उधाण आहे.