फोटो सौजन्य- फेसबुक
सूर्यदेवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनात लगेच सकारात्मक बदल दिसून येतात. भानु सप्तमीचा दिवस सूर्य उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी पूर्ण भक्तिभावाने कठोर व्रत पाळल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धी मिळते. यासोबतच करिअरच्या क्षेत्रातही यश मिळते.
भानु सप्तमीचा दिवस हिंदू धर्मात विशेष मानला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीला म्हणजेच रविवार, 25 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. भानु सप्तमी ही भगवान सूर्याच्या उपासनेला समर्पित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान सूर्याची उपासना केल्याने दैवी ऊर्जा आणि तेज प्राप्त होते.
हेदेखील वाचा- भानु सप्तमीच्या दिवशी या राशीच्या लोकांना ध्रुव योगाचा लाभ
तसेच, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, म्हणून हा दिवस आणखी शुभ होण्यासाठी येथे दिलेल्या उपासना पद्धती, योग, मंत्र इत्यादींबद्दल जाणून घेऊया.
मंत्र
ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
हेदेखील वाचा- जन्माष्टमीच्या दिवशी ‘हे’ रुद्राक्ष धारण करुन बघा
भानु सप्तमीचा शुभ योग
हिंदू पंचांगानुसार, त्रिपुष्कर योग संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3:39 वाजेपर्यंत चालेल. तसेच, रवी योग सकाळी 05:56 ते दुपारी 4:45 वाजेपर्यंत राहील. त्याच वेळी, विजय मुहूर्त दुपारी 2:32 ते 3:24 वाजेपर्यंत असेल. या काळात कोणतेही शुभ आणि नवीन काम करता येईल.
भानु सप्तमीची पूजा पद्धत
सकाळी लवकर उठून पूजाविधी सुरू करण्यापूर्वी स्नान करावे. भक्त प्रथम कलश घेऊन त्यात पाणी, गूळ, रोळी, लाल फुले आणि गंगाजल टाकतात आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात. तिथे उभे राहून सूर्यनमस्कार करा. भगवान सूर्याच्या वैदिक मंत्रांचा जप करा आणि चालिसाचा पाठ करा. या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचीही परंपरा आहे. यानंतर सूर्यदेवाची आरती करून पूजेची सांगता करावी.
काही भक्त या दिवशी भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास देखील ठेवू शकतात. या दिवशी सूडबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पूजेदरम्यान झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी. या दिवशी चुकूनही वडिलांचा अपमान करू नका.
भानु सप्तमी महत्त्व
भामु सप्तमी हा दिवस भगवान सूर्याची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो. सर्व भक्त सूर्याची उपासना करतात. असे मानले जाते की, जे लोक उपवास करतात आणि सूर्याची प्रार्थना करतात त्यांना सुख, समृद्धी प्राप्तच होते.
तसेच, सूर्याची उपासना केल्याने दीर्घकाळांपर्यंत आजारापासून मुक्ती मिळते, चांगले आरोग्य मिळते आणि भगवान सूर्याची उपासना केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.