फोटो सौजन्य- istock
गणेशोत्सवामुळे देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं असून दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींना भक्तांनी निरोपदेखील दिला आहे. आता सात आणि दहा दिवसांच्या गणरायाचं देखील विसर्जन होणार आहे. सांगायचं झालं तर, गणेशोत्सव हा 10 दिवसांचा असतो, पण त्या आधीदेखील तुम्ही गणरायाचं विसर्जन करु शकता. जर तुम्हाला सातव्या दिवशी गणरायाचं विसर्जन करायचं असेल तर, त्यासाठी देखील शुभ मुहूर्त आहे. योग्य ग्रह-नक्षत्रा दरम्यान बाप्पाचं विसर्जन केल्यास ते शुभ आणि लाभदायक मानले जाते.
7 व्या दिवशी विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
प्रातः मुहूर्त – सकाळी 06:05 – सकाळी 10:44 वा.
अपराह्न मुहूर्त – सायंकाळी 04:55 – सायंकाळी 06:28 वा.
अपराह्न मुहूर्त – दुपारी 12:17 – दुपारी 01:50 वा.
रात्री मुहूर्त – रात्री 09:23 – रात्री 10:50 वा.
रात्री मुहूर्त – प्रात: 12:17 – सकाळी 04:38, दि. 14 सप्टेंबर
हेदेखील वाचा- श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाचे सत्य आधीच सांगितले होते, जाणून घ्या
विसर्जनासाठी महत्त्वाचा दिवस कोणता?
गणरायासाठी भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भावना असते. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा असते. गणरायाच्या आगमनानंतर काही दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना प्रचंड वाईट वाटते. या चार दिवसांचा गणपती उत्सव अधिक शुभ मानला जातो. पण सर्वात जास्त महत्त्व अनंत चतुर्थीला असते म्हणजेच गणपतीचा दहावा दिवस. दहाव्या दिवशी गणरायाची पूजा केली जाते आणि हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो.
हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यातील एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
अनंत चतुर्दशी कधी आहे
यावर्षी अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.10 वाजल्यापासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाचा विधी
गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची पूजा त्यांच्या आवडत्या वस्तूंनी केली जाते. दुर्वा, मोदक, लाडू, सिंधूर, कुमकुम, अक्षत, पान, सुपारी, लवंग, इलायची, हळद, नारळ, फूल, अत्तर, फळे अपर्ण करावीत. पूजेचा विधी करताना ॐ श्री विघ्नराजाय नमः। या मंत्राचा जप करावा.
घर किंवा मंडळात जेथे गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. तेथे आरती आणि हवन करावे, आता एका पाटावर गंगाजल शिंपडावे, त्यावर स्वास्तिक चिन्ह तयार करुन लाल कपडा अंथरावा.
गणपती प्रतिमा आणि त्यांना अर्पित करण्याची सर्व सामग्री पाटावर ठेवावी. त्यानंतर ढोल, ताशा आणि वाजंत्री सोबत आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढावी.
त्यानंतर समुद्र, नदी किंवा पालिकेच्या कृत्रिम तलावावर बाप्पाला आणावे, त्यानंतर विसर्जनापूर्वी पुन्हा गणपती बाप्पाची कापूर पेटवून त्याने पुन्हा एकदा आरती करावी.
बाप्पाच्या पूजेत काही चूक वगैरे झाली असेल तर माफी मागावी, त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पाला येण्याची विनंती करावी. ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर। यत्र ब्रह्मादयो देवाः, तत्र गच्छ हुताशन या मंत्राचा जप करीत बाप्पाच्या मूर्तीला हळूहळू पाण्यात सोडावे.