फोटो सौजन्य- istock
पंचांगानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात श्रावण महिना विशेष असणार आहे. या आठवड्यात श्रावणी सोमवार व्रत आणि नागपंचमीसह अनेक सण साजरे केले जाणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण सोमवारचे व्रत केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्पापासून मुक्ती मिळते.
फोटो सौजन्य- उद्यापासून पहिला श्रावणी सोमवार जाणून घ्या पूजाविधी, शुभ मुहूर्त
श्रावण महिना खूप शुभ मानला जातो. कारण, हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्टचा दुसरा आठवडा 5 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत आहे. हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे, कारण या आठवड्यात अनेक महत्त्वाचे सण आणि उपवास येत आहेत. या काळात सोमवार व्रत, मंगळा गौरी व्रत आणि कल्की जयंती आहे. याशिवाय इतरही अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या आठवड्यात येणाऱ्या सर्व उपवास आणि सणांची माहिती घेऊया.
हेदेखील वाचा- सिद्धनाथ मंदिर कुठे आहे? जाणून घ्या इतिहास
श्रावण महिना शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आज 5 ऑगस्ट रोजी आहे. पंचांगानुसार, या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपासून ते 12 वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल. सोमवारी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 5 वाजून 35 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत.
मंगळागौरी व्रत आणि शुभ मुहूर्त
मंगळा गौरी व्रत मंगळवार 6 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील द्वितीयेला ब्रह्म मुहूर्त 4.31 ते 5.3 पर्यंत असेल. त्याचवेळी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 ते 12.53 पर्यंत असेल.
नागपंचमी तारीख आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुर्ल पक्षातील पंचमी तिथीची सुरुवात 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजून 36 मिनिटांनी होईल. त्याचवेळी, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3:14 वाजता संपेल. उदय तिथीवर आधारित नागपंचमीचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
कल्कि जयंती तारीख आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी 10 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा 3 वाजून 14 मिनिटांनी सुरु होईल. त्याचवेळी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी या तिथीची समाप्ती होईल. त्यामुळे 10 ऑगस्ट रोजी कल्की जयंती साजरी केली जाणार आहे.
तुलसीदास जयंती कधी आहे
यावर्षी 11 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तुलसीदासांची 527 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, सप्तमी तिथी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5:44 वाजता सुरू होईल, जी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7:55 वाजता समाप्त होईल.






