मल्लिकार्जुन खरगे आणि नितीन गडकरी हे एकत्रितपणे उपराष्ट्रपती निवडणूक 2025 मतदान प्रक्रियेसाठी हजर राहिले (फोटो - सोशल मीडिया)
Vice President election 2025 : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धुमाळी सुरु आहे. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही आघाडींकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून फोन करुन खासदारांना मतदानाचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये राजकीय ऐक्याची एक अनोखी बाब या मतदान प्रक्रियेमध्ये दिसून आली.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये थेट लढत आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्वच खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात पहिले मतदान केले.उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील समोर आले. यानंतर विविध खासदारांनी मतदान केले. मुरलीधर मोहोळ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावताना फोटो शेअर केला आहे. दरम्यान, सर्वात जास्त चर्चा ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मतदानाची ठरली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खरगे आणि गडकरी यांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ
उपराष्ट्रपती पदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला व्हिडिओ म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आहे. यामध्ये दोन्ही नेते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार होते. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीन गडकरींचा हात धरला होता. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या या मिलनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.. यासोबतच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून राजकीय टोलेबाजीही केली जात आहे. हे प्रकरण दोन विरोधी पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून चर्चा होणे अपरिहार्य होते.
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एक साथ हाथ पकड़कर वोट डालने पहुंचे।
मोदी जी आप चिंता मत करो नितिन जी के घोटाले सामने आने के बाद ऐसे लोगो का वोट नहीं चाहिए pic.twitter.com/LeBDaobsqJ
— Manjeet Ghoshi (@ghoshi_manjeet) September 9, 2025
राहुल गांधी मतदानासाठी पोहचले उशिरा!
सोशल मीडियावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मलेशियाला वैयक्तिक भेटीवर गेले होते. उपराष्ट्रपती निवडणुकीत राहुल गांधी भाग घेणार नाहीत अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. राहुल गांधीही मतदान करण्यासाठी पोहचले होते, पण त्यांना थोडा उशीर झाला. यादरम्यान, राहुल गांधी लवकरात लवकर मतदान करण्यासाठी पोहचले यादरम्यान खूप गर्दी होती. यासोबतच, मलेशियाहून परतल्यानंतर राहुल गांधींच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यांनी पळत जाऊन उपराष्ट्रपती पदासाठी मतदान केले.
डियर बीजेपी IT Cell वालों फिर से रोजी रोटी पर लग जाओ।
राहुल गांधी जी इंडिया आ गए हैं और वोट भी कर रहे हैं। बंदा जहां भी रहता अट्रैक्शन प्वॉइंट बना कर रखता है। #VicePresidentElection #RahulGandhi pic.twitter.com/zOy9YzoJst
— Prof. इलाहाबादी ( نور ) (@ProfNoorul) September 9, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा
हे लक्षात घेण्यासारखे आहे की राज्यसभा आणि लोकसभेत एकत्रितपणे ७८२ खासदारांना मतदान करायचे आहे. मतदान सायंकाळी ५ नंतर संपेल. त्यानंतर मतमोजणी सुरू होईल. निवडणुकीचे निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर केले जातील.