Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2200 वर्ष आधी हिंदू धर्मातील विवाह समारंभ कसे होते ? जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला माहितेय का ? 2200 वर्ष आधी हिंदू धर्मातील विवाह संस्कृती आतापेक्षा काहीशी वेगळी होती. कशी ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 19, 2026 | 04:28 PM
2200 वर्ष आधी हिंदू धर्मातील विवाह समारंभ कसे होते ? जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:
  • 2200 वर्ष आधी हिंदू धर्मातील विवाह समारंभ कसे होते ?
  • प्राचीन काळातील शिल्प काय सांगतात ?
  • पालखी समारंभ, हळद आणि बरचं काही
हिंदू धर्मात सर्वात महत्व दिलं ते म्हणजे विवाह पद्धतीला. राज्य, जिल्हा किंवा गावागावांच्या विवाहाच्या पद्धती आणि रितीरिवाज वेगवेगळे असले तरी हा सोहळा अत्यंत पवित्र असा मानला जातो. पण तुम्हाला माहितेय का ? 2200 वर्ष आधी हिंदू धर्मातील विवाह संस्कृती आतापेक्षा काहीशी वेगळी होती. कशी ते जाणून घेऊयात.

प्रचीन काळातील हिंदू विवाह पद्धीतीचे काही पुरातन अवशेष सापडलेले आहेत. त्यानुसार तेव्हाच्या लग्नपद्धतींचा अंदाज लावता येतो. याबाबतची सविस्तर माहिती आर्यभूमी या इन्स्टाग्रामवरुन देण्यात आली आहे. चंद्रकेतुगढच्या मातीकामावर उभ्या असलेल्या या अद्भुत शिल्पात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा एक भारतीय विवाह जिवंत होतो. हे भारतातील सर्वात प्राचीन विवाह-दृश्यांपैकी एक आहे.

हळदी समारंभ !

प्राचीन काळातील शिल्प सापडले त्यानुसार, एका भागात स्त्रिया वर्तुळात उभ्या आहेत आणि मध्यभागी बसलेल्या वधूसमोर हळदीचा सोहळा घडतो आहे. शिल्पातील कोरीवकामातून स्पष्ट दिसून येतं की, काही आकृत्या अशा आहेत ज्या, आताच्या हळदी समारंभाशी मिळत्या जुळत्या आहेत. स्त्रियांच्या हातातील वाट्या, उभ्या आकृत्यांतील हालचाल, आणि त्या क्षणाची सामूहिक ऊर्जा सगळं काही या सोहळ्याच्या पवित्रतेची जाणीव करून देतं.

पालखी समारंभ !

याच कोरीवकामाबरोबर आणखी एक शिल्प दिसून आलं ते म्हणजे, वधूची माहेरून पाठवणी कराताना असलेल्या पालखीची.
चार ते सहा पुरुष खांद्यावर दांडका धरून पालखी पुढे नेत आहेत. आत बसलेली स्त्री अत्यंत शांत मुद्रेत दिसते. हे शिल्प आताच्या विवाहसंस्कृतीतील वधूच्या पालखीसारखा दिसतो. ही पालखीच्या कोरीवकामावर प्राणी चित्र प्रवासाच्या मंगलतेची खूण बनतं. हे दृश्य सांगतं की विवाह हा केवळ घरातील मुद्दा नव्हता तो एक संपूर्ण समुदायाच्या सहभागाने साजरा होणारा उत्सव होता.

Premanand Maharaj : घरी केलेली पूजा आणि देवळात घेतलेलं दर्शन दोन्हीत फरक काय ? प्रेमानंद महाराजांनी दिलं भन्नाट उत्तर

पवित्र लाजाहोम !

हिंदू विवाहसंस्कृतीत सात फेरे घेताता वधू आणि वर एकमेकांना वचनं देतात. त्यावेळी अग्नीदेवतेला साक्ष ठेवली जाते. याला मिळती जुळती शिल्प देखील सापडली. अग्नी कुंडात आहुती देण्याचा तो क्षण इतका बारकाईने दाखवला आहे की आजही लग्नात हा विधी पाहताना दिसणारी तीच भावस्पंदने इथे जाणवतात. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा लाजाहोम हिंदू विवाहाच्या अखेरच्या, सर्वात पवित्र विधीचे दर्शन घडवतो.

पवित्र लाजाहोम !

या पात्रातील प्रत्येक स्तर एक कथा सांगतो स्त्रियांचे आभूषण, पुरुषांचे वस्त्र, संगीत, नृत्य, अन्नपदार्थ, उत्सवातील चैतन्य. हा वाडगा केवळ मातीचा नाही; एक संपूर्ण संस्कृतीने आपल्या स्मृती इथे कोरून ठेवल्या आहेत. आजचा भारतीय विवाह कितीही आधुनिक झाला तरी त्याची मूळ धडधड इथेच आहे चंद्रकेतुगढच्या या मूक पण जिवंत साक्षीत आहे. हळद, पालखी, आणि लाजाहोम आपण आजही करतो ते सगळं इथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या शिल्पावर आहे. या सुंदर कथनात भारतीय विवाहाची सातत्यता, त्याची भावना, आणि त्याची परंपरा काळाला हरवून पुढे चालत राहिली आहे. हे शिल्प सांगतं की आपली संस्कृती केवळ टिकून नाही, तर प्रत्येक पिढीसोबत नव्यानं जिवंत होत राहिली आहे.

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, पितृदोषापासून मिळेल आराम

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: How were hindu wedding ceremonies held 2200 years ago find out in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

मराठी अभिनेत्री मानसी नाईक जबरदस्त कमबॅक, “मन आतले मनातले” चित्रपटाचे पोस्टर रिलीज
1

मराठी अभिनेत्री मानसी नाईक जबरदस्त कमबॅक, “मन आतले मनातले” चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ
2

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, अभ्यासात आणि करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
3

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, अभ्यासात आणि करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता
4

Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.