फोटो सौजन्य- pinterest
श्रीकृष्णाला या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी या गोष्टींचा नैवेद्या दाखवणे फायदेशीर मानले जाते. श्रीकृष्णांना त्यांच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवल्याने त्या व्यक्तीला श्रीकृष्ण प्रसन्न होतात. त्यासोबतच त्यांना फुले देखील खूप आवडतात. ही फुले अर्पण करणे खूप शुभ मानली जाते. त्यांना ही फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला कोणते नैवेद्य आणि फुले अर्पण करावीत ते जाणून घ्या
जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यावेळी श्रीकृष्णाला दूध, दही, लोणी इत्यादी गोष्टी आवडत असल्याने त्या अर्पण केल्या जातात. यामुळे त्यांना पंचामृताने अभिषेक करावा. तसेच, दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेले पंचामृत अर्पण करावे. त्यामध्ये तुळशीच्या पानांचा देखील समावेश करावा.
जन्माष्टमीला पंचामृतासोबतच खिरीचा नैवेद्य देखील दाखवणे शुभ मानले जाते. यामुळे भक्तांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. असे केल्याने भक्ताला अपत्यप्राप्तीचे सुख मिळते.
जन्माष्टमीच्या दिवशी पूजेवेळी काकडी अर्पण करावी. त्या दिवशी रात्री काकडी कापून ती श्रीकृष्णाला अर्पण करावी म्हणजे त्यांचा नैवेद्य दाखवावा.
श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेच्या व्यतिरिक्त पीठ किंवा धणे पंजिरी आवडते. यामुळे तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रसादामध्ये पीठ किंवा धणे पंजिरीचा समावेश करावा. त्यामुळे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रीकृष्णाला कमळाचे फूल खूप आवडते. या फुलाला दिव्यता, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेकदा कमळावर बसलेले किंवा हातात कमळ धरलेले दाखवले जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला नेहमी वैजयंतीच्या फुलांचा हार घालत असत, म्हणूनच हे फूल त्यांना विशेष प्रिय आहे. ते सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते.
पारिजाताला दिव्य फूल मानले जाते. मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने ते स्वर्गातून पृथ्वीवर आणले. त्याची पांढरी सुंगधित फुले ती रात्रीच्या वेळी उमलतात.
असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाच्या नावावरुन कृष्ण कमल फुलांचे नाव ठेवण्यात आले आहे. तसे बघायला गेल्यास रचनेमध्ये कृष्ण, राधा आणि पांडवांची प्रतीकात्मक रूपे दिसतात. हे फूल श्रीकृष्णाला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)