फोटो सौजन्य- pinterest
जितिया व्रताच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 4.38 ते 5.26 असेल. सकाळचा मुहूर्त 5.2 ते 6.15, अभिजित मुहूर्त सकाळी 11.46 ते दुपारी 12.34, गोधुलि मुहूर्त संध्याकाळी 6.5 ते 6.29, सायंकाळचा मुहूर्त 6.5 ते 7.18
द्रिक पंचांगानुसार, जितिया व्रत पारण करण्यासाठी वेळ रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.28 वाजल्यानंतर करावे.
भगवान जिमुतवाहन यांची मूर्ती
फुले
फुलांची माळ
पिवळे वस्त्र
मातीचा दिवा
वात
अगरबत्ती
धूप
कापूर
तांब्याचे भांडे
सिंदूर
गंगाजल
पंचामृत
जितिया व्रताच्या कथेचे पुस्तक
ठेकुआ
पारंपरिक पदार्थ
बांबूची टोपली
मरुआ पीठ
खडी
शय्या
लाल किंवा पिवळे वस्त्र
कुशा
कलश किंवा लोटा
पाणी
तांदूळ
रोळी
चंदन
हळद
दुर्वा
ताजी फुले
विड्याचे पान
सुपारी
लवंग
वेलची
लाल किंवा पिवळा जितिया धागा
मोसमी फळे
मिठाई
भिजवलेले हरभरे
जितिया व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर देवाजवळ दिवा लावावा. नंतर हातामध्ये पाणी, फूल आणि तांदूळ घेऊन मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
जर तुमच्याकडे ओघगन किंवा सरगी खाण्याची परंपरा असेल, तर सूर्योदयापूर्वी त्याचे सेवन करा.
पूजेसाठी एका चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगांचे वस्त्र अंथरा. त्यानंतर दुर्वाने जीवीत्पुत्रिकाची मूर्ती तयार करा. बाजारात मिळणारा फोटो देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर फूल, हार, सिंदूर, तांदूळ, रोली, दुर्वा, नैवेद्य, मिठाई, फळ इत्यादी अर्पण करा. यासोबतच लाल किंवा पिवळा रंगांचा जितिया धागा पण अर्पण करा.
नंतर तुपाचा दिवा लावून जितिया व्रताची कथा वाचावी. कथा वाचून किंवा ऐकून झाल्यानंतर आरती करा आणि देवाजवळ मुलांच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा.
जितिया व्रत पूजेच्या वेळी नैवेद्यात ठेकुआ, पारंपरिक पदार्थ, मिठाई, भिजवलेले हरभरे, मोसमी फळे आणि पंचामृत यांचा समावेश असतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






