फोटो सौजन्य- pinterest
आज मंगळवार, 1 जुलैपासून या महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्यात येणारे सण व्रत यांना मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. तसेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्रावण महिन्याची देखील सुरुवात होणार आहे. हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यामध्ये आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा, हरियाली तीज यांसारखे व्रत त्योहार येत आहे. जुलै महिन्यात येणाऱ्या सण उत्सव, व्रतांची यादी जाणून घ्या
गुप्त नवरात्रीच्या दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास मासिक दुर्गाष्टमी खास मानली जाते. कारण हा दिवस तंत्र विद्या इत्यादींसाठी खास मानला जातो.
आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवसापासून चार्तुमासाची सुरुवात होते. यावेळी कोणतेही शुभ कार्ये केले जात नाही.
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. हे व्रत मंगळवारी येत असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत म्हटले जाते.
या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे म्हणजेच गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी कोकिळा व्रत देखील आहे.
संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. यालाच गजानन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात,
हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सण आणि व्रत साजरे केले जाणार आहे.
हरियाली तीज व्रताच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.
विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास करुन पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.
या दिवशी विवाहित महिला नागाची पूजा करतात. त्याला दूध लाया बताश्याचा नैवेद्य दाखविला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






