फोटो सौजन्य- सोशल मीडिया
हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा संबंध सूर्य देवाशी आहे, कारण सूर्य देव वर्षातील 12 महिने 12 राशींमध्ये संक्रमण करतो. ज्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतं तीळगूळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी नववधू काळी साडी परिधान करून त्यावर हलव्याचे दागिने घालते. या हलव्याला, तिळगुळाला मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. बाजारात अनेक प्रकारचे सुंदर हलव्याचे दागिने आले आहेत. मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घातले जातात? ही परंपरा नक्की काय आहे? हे दागिने घालण्यामागचे कारण काय आहे? जाणून घ्या
मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालणे ही पारंपारिक मराठी परंपरा आहे, या सणासोबत कापणीच्या हंगामाची सुरूवात होते. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्याना महत्त्व आहे. या दिवशी काही लोक हलव्याच्या गोड पदार्थाचा उपयोग करुन विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात. या दागिन्यांचा वापर पारंपरिक पूजा, विवाह सोहळे आणि इतर धार्मिक कार्यक्रमासाठी केला जातो. साधारणतः तिळाच्या गुळाचा हलवा या दागिन्यामध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश त्यमागे असतो. याला हलवा हार म्हणूनही ओळखले जाते.
सूर्य आणि मंगळाचा समसप्तक योग या राशीच्या लोकांच्या आयुष्यात निर्माण करेल वादळ
मकर संक्रांतीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागामध्ये हलव्याच्या दागिन्यांचे विविध प्रकार आढळतात. हे दागिने मुख्यत: महिलांसाठी तयार केले जातात, पण काही ठिकाणी पुरुषांनाही याचा वापर केला जातो. काही लोक हलव्याचे गोड पदार्थ एका ठराविक आकारात कट करून हार, बांगड्या, अंगठ्या, चूडया अशा विविध गोड दागिन्यांचे रूप देतात. दागिन्यांचे ह्याच विविध आकारामुळे सणाच्या वेळी लोकांना एक खास आनंद आणि आत्मसंतोष मिळतो. यामुळे एक अद्वितीय संस्कृती व परंपरेची अनुभूती घेतली जाते.
नवविवाहित जोडपे, नवजात मुलं आणि गर्भवती स्त्रिया सहसा हलव्याचे दागिने घालतात
या दिशेला खिडकी असल्यास होऊ शकतात आजार, जाणून घ्या कसे टाळावे
हलव्याच्या दागिन्यामध्ये हार, मुकुट, नथ, कानातले, केसांची जेव्लरी, कमरबंद, बांगड्या आणि अंगठ्याचा समावेश असतो.. लहान, साखरयुक्त पांढऱ्या हलव्याला इमिटेशन ज्वेलरीसह एकत्र करून हे दागिने बनवले जातात.
हलव्याचे दागिने परिधान करणाऱ्याच्या भविष्यातील आशीर्वादांच्या आशेचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हलव्याचे दागिने घालून नवीन वर्ष गोड आणि आनंदाचे जावे म्हणून प्रार्थना करतात.
मात्र, काळाच्या बदलासोबत हलव्याच्या दागिन्यांमध्ये देखील काही बदल घडले आहेत. पूर्वी हलव्याच्या दागिन्यांची बनावट साधी होती, परंतु आजकाल त्यात जास्त सर्जनशीलता, आधुनिक डिझाइन आणि रंगांची भर घालण्यात आलेली आहे. हलव्याच्या दागिन्यांमध्ये लोखंडी, चांदी, आणि सोन्याचा वापर केल्याने त्यात अधिक आकर्षण येते. हलवा हारला आधुनिक डिझाइनची जोड देणे, सोने-चांदीच्या सुईने सजवलेले हलवे, तिळाच्या गुळाच्या कणांच्या स्वरूपात आकर्षक बनवले जातात.