फोटो सौजन्य- istock
यंदा नवरात्र गुरुवार, 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या दिवशी घरामध्ये कलशाची स्थापना करण्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धार्मिक पुराणांमध्ये कलश हे भगवान श्री हरी नारायण यांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना घरामध्ये योग्य प्रकारे केल्यास, देव स्वतः त्या भक्तांवर आपला विशेष आशीर्वाद देतो. जर एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर त्याच्या आयुष्यातील आजपर्यंतची सर्व पापे नष्ट होतात. नवरात्रीच्या उपासनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचे उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की, या उपायांचे पालन केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जा पसरते.
नवरात्र कधीपासून आहे
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदा ही तिथी बुधवार 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल. तर शुक्रवार 4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.
हेदेखील वाचा- तळहातावरील सूर्य पर्वताच्या शुभ अशुभ संकेताबद्दल जाणून घ्या
कलश स्पानेचा मुहूर्त
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. यंदा हा मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 पासून ते 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल
नवरात्रामध्ये कलश स्थापन करण्याची शुभ दिशा
नवरात्रीच्या काळात कलश स्थापनेसाठी सर्वात शुभ दिशा ईशान्य मानली जाते. या दिशेला देवी-देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते. जर कलशाची स्थापना ईशान्य दिशेला केली तर घरामध्ये नक्कीच सकारात्मक शक्तीचा प्रवाह होईल आणि तुम्हाला माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळेल.
हेदेखील वाचा- वास्तूशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व कोणते?
अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची शुभ दिशा
नवरात्रीच्या नऊ दिवसांत घराघरात अखंड ज्योत पेटवली जाते. वास्तुशास्त्रात अखंड ज्योती पेटवण्याची योग्य व शुभ दिशा आग्नेय दिशेला सांगितली आहे. या दिशेला अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि घरात धनाची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.
कलश स्थापना करण्याची पूजा पद्धत
नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला.
याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे.
कलशावर धागा बांधा. त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा.
तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.