फोटो सौजन्य- pinterest
आज 18 स्पटेंबर गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. चंद्र कर्क राशीतून दिवसरात्र संक्रमण करणार आहे. चंद्र स्वतःच्या राशीत असल्याने गौरी योग तयार करेल तर शुक्र ग्रह तिथेच उपस्थित असल्याने सुनफ योग तयार होईल. आज गुरु पुष्प योग देखील आहे. आश्लेषा नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि शिव योग हे शुभ योग तयार होतील. शिवयोग आणि विष्णूंच्या आशीर्वादामुळे मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. गुरुवारच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आज सकारात्मकतेचा फायदा होईल तसेच नशिबाची साथ मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. धाडसी निर्णय आणि कार्यक्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला काही तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाचा फायदा होईल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या चिंता दूर होतील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव किंवा आदर वाढेल. तुमची रखडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमच्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या भावडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ आणि कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. व्यवसायामध्ये उत्पन्नात वाढ होईल. तुमची अचानक एखाद्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी भेट होऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्यशाली राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला भौतिक सुखसोयी आणि वाहन मिळण्याची शक्यता आहे. महिला सहकाऱ्याच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसाय आणि कामासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
कुंभ राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचे विरोधक आणि शत्रू देखील तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतील. तुम्हाला विमा आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना कामामध्ये विशेष यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नाच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)