(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आर्यन खान दिग्दर्शित “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच मुंबईत प्रीमियर पार पडला. शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब, बॉलीवूडमधील अनेक प्रमुख व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी प्रीमियरला हजेरी लावली. शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” च्या ग्रँड प्रीमियरला पोहोचला. संपूर्ण प्रीमियरमध्ये खान कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकत्र पोज देताना सर्वांच्या नजरा या सुपरस्टार कुटुंबावर खिळल्या होत्या.
“द बॅडीज ऑफ बॉलीवूड” प्रीमियरसाठी सुहाना खानने एक आकर्षक, बोल्ड, उंच स्लिट मस्टर्ड-यलो गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या शेजारी उभा असलेला शाहरुख खान पूर्णपणे काळ्या रंगाच्या पोशाखात दिसला होता. शाहरुख खान कॅज्युअल पण आकर्षक दिसत होता. त्याने स्लीक जॅकेट आणि लेयर्ड ॲक्सेसरीजसह त्याचा लूक पूर्ण केला.
थिएटरनंतर आता OTT वरही ‘Saiyaara’ चा धुमाकूळ; ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट
गौरी खान टीप निळ्या गाऊन आणि सुंदर नेकलेस घातला होता. तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच आर्यन खानने देखील काळ्या रंगाचा पोशाख दिसला. याचदरम्यान संपूर्ण खान कुटुंब एकत्र दिसले आणि त्यांना पाहून चाहत्यांना आनंद देखील झाला.
अबराम खानने त्याच्या भावाच्या पहिल्या शोच्या प्रीमियरसाठी स्टायलिश ब्लॅक जॅकेट आणि जॉगर-स्टाईल ट्राउझर्स निवडले. संपूर्ण खान कुटुंबाने एकत्र अनेक फोटो काढले, ज्यामुळे चाहत्यांना रेड कार्पेटवर एक दुर्मिळ कौटुंबिक क्षण मिळाला. शाहरुख खानने आर्यनला पापाराझीसारखे फोटो काढण्यास सांगितले. पापाराझीने खान कुटुंबाचे फोटो काढत असताना आर्यन त्याच्या मोबाईल फोनवर तो क्षण टिपताना दिसला.
Disha Patani House Firing: गाझियाबादमध्ये चकमक; दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार
बॉलीवूड स्टार बॉबी देओल, लक्ष्य, सहेर बंबा, मनोज पहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंग, मनोज पहवा आणि विजयंत कोहली यांच्यासोबत रजत बेदी आणि गौतमी कपूर हे सगळे “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. आर्यन खानच्या शोमध्ये सलमान खान, करण जोहर आणि रणवीर सिंग हे देखील विशेष उपस्थितीत दिसतील.