Breaking News अपडेट
18 Sep 2025 10:10 AM (IST)
कॅप्टनसी टास्क दरम्यान, स्पर्धकांना एक-एक करून बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला गौरवने नीलमला बाहेर काढले, त्यानंतर नेहलने झीशानला बाहेर काढले. त्यानंतर फरहानाने तान्याला बाहेर काढले, तर बसीरने शाहबाजवर निशाणा साधला. प्रणीतने मृदुलला बाहेर काढले आणि आवेजने अशनूरला बाहेर काढले. नेहलने अमाल मलिकला देखील टास्कमधून बाहेर काढले. अभिषेक बजाज हा शेवटचा उरलेला स्पर्धक होता, अशा प्रकारे तो घराचा कॅप्टन बनला आहे.
18 Sep 2025 10:08 AM (IST)
कॅलिफोर्नियाच्या वाळवंटातील जोशुआ ट्रीमधील "इनविजिबल हाउस" आजकाल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ते दिवसाही अदृश्य असते, परंतु एका सेल्फीची किंमत $10,000 (8.78 लाख रुपये) आहे! टिकटॉकर शॉन डेव्हिसने खुलासा केला की या $2,400 प्रति रात्रीच्या काचेच्या घरात सेल्फी काढण्यासाठी त्याला $10,000 खर्च आला. हा भविष्यकालीन शीश महाल नेटफ्लिक्सच्या "World’s Most Amazing Vacation Rentals" मध्ये प्रदर्शित झाला आहे आणि डेमी लोवाटो आणि लिझो सारख्या सेलिब्रिटी देखील तिथे राहिले आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता लोक याला "हा एक हॉरर शो' असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.
18 Sep 2025 09:30 AM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणामध्ये महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. याचबरोबर मुंबईमध्ये कोरोना काळामध्ये कफनचोरी झाली असल्याचा गंभीर आरोप केला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
18 Sep 2025 09:17 AM (IST)
मुंबईमधून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात एका नामंकित शाळेमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून ४ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील महिला कर्मचाऱ्यांवर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
18 Sep 2025 09:05 AM (IST)
तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात आयोजित मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा नागरिकांनी सहभाग नोंदविला.
18 Sep 2025 08:54 AM (IST)
प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
18 Sep 2025 08:52 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना नागपुरात मोठ्या भावांनी मिळून दारूड्या धाकट्या भावाची बेदम मारहाण करून हत्या केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे आई आणि वहिणीनेही त्यांना साथ दिल्याचे समोर आले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
Marathi Breaking News Updates : राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज एकदिवसीय संप केला जाणार आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजि’ पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यकीय पद्धतीत नोंदणीची परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड) यांनी तीव्र विरोध केला.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील रूग्णसेवेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सरकार व एमएमसीने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सेंट्रल मार्डने दिला आहे. होमिओपॅथी पद्धतीला विरोध करत नाहीत, पण प्रत्येक वैद्यकीय शाखा आपल्या शास्त्रीय चौकटीतच कार्य करावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या डॉक्टर्सकडून संपावर जाण्याचा इशारा दिला गेला आहे.