मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष
असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंकचा वाढता ग्राहक आधार आणि वापराची वाढती व्याप्ती यामुळे स्पेसएक्सला त्याचा कमर्शियल बिजनेस मजबूत करण्यास आणि त्याचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यास मदत होत आहे. याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनीकडे डायरेक्ट-टू-डिवाइस इंटरनेट आणि स्पेस-ट्रॅकिंग सर्विस वाढवण्याची देखील योजना आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रॉयटर्सने म्हटलं आहे की, स्टारलिंकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल डिव्हाईस तयार करण्याच्या योजना आहेत. गेल्या आठवड्यात एका यूजरने कथित स्टारलिंक फोनबाबत पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी उत्तर देत म्हटलं होतं की, कोणत्याही वेळी असं होणं शक्य नाही. तर दुसऱ्या एका पोस्टवर मस्कने स्पष्टपणे सांगितलं होतं की, आम्ही कोणताही फोन डेव्हलप करत नाही. मोबाईल डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स जसे की, त्याची डिझाईन कशी असेल, डेवलपमेंट टाइमलाइन किंवा यामध्ये कोणते खास फीचर्स दिले जाणार, हे सर्व सीक्रेट आहे. सॅटेलाइट इंटरनेट प्रोवाइडरने अलीकडेच T-Mobile सारख्या टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्ससह डायरेक्ट-टू-डिवाइस इंटरनेट सर्विस देण्यासाठी काम केले आहे. मात्र असं असलं तरी देखील एखादा स्मार्टफोन डेव्हलप करणं किंवा त्याची प्लॅनिंग करणं पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
एक मोबाईल डिव्हाईस लाँच केल्यास स्टारलिंकच्या प्रोडक्ट लाइनअपमध्ये मोठा विस्तार केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 9,500 जियोस्पेशियल सॅटेलाइटचा नेटवर्क समाविष्ट आहे, जो जगभरात वायरलेस इंटरनेट सर्विस प्रोव्हाईड करतो. मस्कने दिलेल्या माहितीनुसार, अवकाशातील एकूण स्टारलिंक उपग्रहांपैकी सुमारे 650 उपग्रह स्पेसएक्सच्या डायरेक्ट-टू-डिव्हाइस व्यवसायासाठी आहेत, ज्याचे अंतिम उद्दिष्ट ‘पृथ्वीवर सर्वत्र संपूर्ण सेल्युलर कव्हरेज’ प्रदान करणे आहे.
रिपोर्टवर विश्वास ठेवाल तर असा अंदाज वर्तवला जात आहे की, स्टारलिंक कंपनी मोबाईल नेटवर्क सेवा वाढवण्याच्या तयारीत असली तरी यासाठी त्यांचा स्टारशिप रॉकेट महत्त्वाचा ठरणार आहे. हे रॉकेट नवीन आणि अधिक प्रगत स्टारलिंक सॅटेलाइट्स मोठ्या संख्येने अंतराळात पाठवेल, असं सांगितलं जात आहे. याचा परिणाम भविष्यात मोबाईल फोनवर थेट सॅटेलाइटद्वारे अधिक चांगले इंटरनेट मिळू शकते.
Ans: Starlink ही SpaceX कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा आहे, जी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या हजारो सॅटेलाइट्सद्वारे हाय-स्पीड इंटरनेट पुरवते.
Ans: ही सेवा जमिनीवरील टॉवरऐवजी थेट सॅटेलाइटशी कनेक्ट होते. यासाठी युजरकडे एक विशेष डिश आणि राउटर असतो.
Ans: कंपनी Direct-to-Device तंत्रज्ञानावर काम करत असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे भविष्यात फोनवर थेट सॅटेलाइट इंटरनेट मिळू शकते. मात्र, फोन लॉन्चबाबत अधिकृत घोषणा नाही.






