फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, रविवार 20 जुलै रोजी केतू आपले नक्षत्र बदलणार आहे. केतू ग्रह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये आपले संक्रमण करणार आहे. त्यामुळे राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूला छाया ग्रह मानले जाते. या दोन्ही ग्रहांची ओळख ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ ग्रह म्हणून आहे. कुंडलीमध्ये या ग्रहांची अशुभ स्थिती असल्यास त्याचा परिणाम काम करणाऱ्या लोकांवर होताना दिसतो. त्याचबरोबर करिअर, नोकरी आणि नातेसंबंधावर देखील होतो. असे म्हटले जाते की, राहू हा व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम करत असल्याने व्यक्तीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तर केतू हा विचार न करता कृती करण्यास भाग पाडणारा ग्रह मानला जातो. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
या ग्रहांच्या संक्रमणामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ही महत्त्वाची घटना मानली जाते. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. तर या दोन्ही ग्रहांचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर अशुभ पडतो. राहू केतूच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा होईल ते जाणून घ्या
राहू-केतूच्या संक्रमणाचा परिणाम कन्या राशीच्या लोकांवर होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये या काळात अनेक समस्या कमी होऊ शकतात. प्रेमसंबंध सुधारू शकतात. या काळात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगला यश मिळेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
राहू-केतूच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांची प्रतिष्ठा आणि ओळख वाढेल. समाजात चांगली प्रतिमा निर्माण केल्यास तुम्हाला सामाजिक पातळीवर फायदे मिळतील. तुमचे आरोग्य सुधारेल. परदेशांशी संबंधित काम यशस्वी होईल आणि नवीन व्यवसायाच्या निमित्ताने परेदशात जाण्याच्या संधी उपलब्ध होतील. या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तसेच तुम्हाला करिअर आणि नोकरीमध्ये अरेक्षित यश मिळेल.
राहू-केतूच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांचा हा काळ चांगला राहील. या लोकांची कौशल्ये वाढलेली राहतील. संवाद, विचार आणि संपर्काशी संबंधित क्रियाकलापांमधून नफा मिळवण्याच्या संधी निर्माण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या लोकांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. नातेसंबंधामध्ये असलेली कटुता दूर होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. या काळामध्ये गुंतवणूक करणे चांगले मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)