फोटो सौजन्य - Social Media
भक्त प्रल्हाद म्हणजे भगवान विष्णूंचा परमभक्त! ज्याच्या रक्षणासाठी स्वतः विष्णूंनी अवतार घेतला. याच कुळात, प्रल्हादाच्या पोटी विरोचनाचा जन्म झाला. विरोचनही आपल्या वडिलांसारखा विष्णुभक्त! त्यालाही जनसेवेची मोठी आवड! पण विरोचन आणि स्वर्गसम्राट इंद्रामध्ये काही वाद नेहमीच चालत असे. कारण विरोचन हा एक असुरसम्राट होता. बळीच्या जन्मानंतर विरोचनाला असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्यांना ज्ञान साधनेदरम्यान लागलेल्या सुगाव्याला सांगितले. शुक्राचार्य म्हणाले “तुझा मृत्यू अटळ आहे विरोचना आणि तेही लवकरच. पण घाबरू नकोस! तुला यातून वाचायचे असेल तर आपलीकडे मार्ग आहे. तुला हिमालयात जाऊन. त्या भीषण थंडीला सोसून. उन्हाचा आणि पावसाचा विचार न करता. सलग १० वर्षांसाठी तपश्चर्या करावी लागेल आणि हाच मार्ग तुझे प्राण वाचवेल.
विरोचन हिमालयात जाऊन १० वर्षांसाठी सलग उभा राहून तपश्चर्या करतो. या तपश्चर्येने स्वतः सूर्यदेव प्रसन्न होतात. त्याला दर्शन देऊन विरोचनाला एक मुकुट प्रदान करतात. हा मुकुट जोपर्यंत विरोचनाच्या मस्तकी असेल तो पर्यंत त्याला मुर्त्यू स्पर्शही करू शकणार नाही. ते मुकुट परिधान करता विरोचन त्याच्या साम्राज्याकडे निघतो. वाटेत एक ब्राह्मण वेशधारी साधू विरोचनाला जल प्रदान करतो. विरोचन तसा दयाळू मनाचा, तो कसलाही विचार न करता. ते जल प्राशन करतो. पिताच विरोचन जमिनीवर ढासळतो आणि तो ब्राह्मण वेशधारी साधू त्याच्या खऱ्या रूपात येतो. तो इंद्र असतो! जमिनीवर ढासळेल विरोचन त्याला शांतपणे सांगतो की ‘देवेंद्रा! मला ते मुकुट दे.’ पण इंद्र ऐकत नाही आणि विरोचनाला युद्ध करून ते जिंकण्याचे आवाहन करतो. विरोचन आवाहन स्वीकारत इंद्राशी युद्ध करतो पण यात शेवटी इंद्र त्याची माया वापरून आपल्या वज्राने विरोचनाला जागीच ठार करतो.
ही बातमी बळीला कळताच. बळी स्वर्गाकडे स्वार होतो. इंद्राशी युद्ध करतो पण यात इंद्र पुन्हा मायेचा वापर करत आपल्या वज्राच्या साहाय्याने बळीलादेखील जागीच ठार करतो पण बळी ठार होताच. स्वयं विष्णू तिथे प्रकट होतात आणि रागावून स्वर्गातल्या सर्व देवांशी नाते तोडून टाकतात. बळीही भक्त प्रल्हाद इतकाच त्यांना प्रिय असतो. तेवढ्यात शुक्राचार्य स्वर्गात दाखल होतात आणि त्यांच्या दैवी आराधनेने बळीला पुनर्जीवित करतात.
अनेक वर्षांसाठी सगळं काही नीट सुरु असतं. बळीसारखा शासक तिन्हीलोकात नव्हता. प्रजेसाठी असणारा प्रजेचा शासक अशी त्याची ओळख होती. तेवढ्यात शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून बळी स्वर्गावर धावून जातो. या युद्धात तो तिन्ही लोकांचा स्वामी बनतो आणि स्वर्गातले देव सारे बेघर होतात. तेव्हा देवमाता आदिती विष्णूंना त्यांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून देते आणि देवरक्षणाकरिता विष्णू वामन अवतार घेतात आणि बळीच्या दानशूरतेची परीक्षा घेत तिन्ही पावलांमध्ये काबीज केलेले आकाश, पृथ्वी आणि स्वतः बळीचे मस्तक बळीकडून घेतात आणि बळी ते सारं आनंदाने विष्णूंच्या अधिपत्यात देतात. विष्णू प्रसन्न होऊन बळीला पाताळाचा शासक म्हणून नियुक्त करतात आणि वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटायला येण्याची परवानगी देतात.