फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 18 ऑक्टोबरचा दिवस. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावा दिवस आहे, ज्याला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते आणि आज चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तसेच गुरू कर्क राशीत संक्रमण करेल जो गुरूसाठी चंद्राचा उच्चता राशी आहे, ज्यामुळे हंस राजयोग तयार होईल. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग देखील तयार होईल. उत्तराफाल्गुनी नक्षत्रामुळे ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहेत. धनत्रयोदशीचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे, जाणून घ्या
धनत्रयोदशीचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात गुंतलेल्यांना उत्पन्नात वाढ होताना दिसेल. वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनातही आनंद मिळेल. तसेच तुम्हावा वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. गुंतवणुकीतून तु्म्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित नफा होईल. तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्हाला मित्राच्या मदतीचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुम्ही एक कायमस्वरूपी गुंतवणूक कराल आणि भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आर्थिक योजनांमध्ये फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नवीन संधी मिळतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला सामाजिक क्षेत्रातही अपेक्षित यश मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वाची संधी मिळू शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता. त्यासोबतच कपडे आणि दागिन्यांची खरेदी करु शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात अपेक्षित यश होईल. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक किंवा नातेसंबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)