फोटो सौजन्य- pinterest
कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला बुध प्रदोष व्रत आहे. हे प्रदोष व्रत बुधवारी येत असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत असे म्हटले जाते. या काळामध्ये भगवान महादेवांची पूजा केली जाणार आहे. हे व्रत सूर्यास्तानंतर पाळले जाणारे व्रत आहे. जो व्यक्ती प्रदोष व्रत पाळतो त्या व्यक्तीचे सर्व दुःख आणि दोष महादेवाच्या कृपेने दूर होतात. यावेळी ऑगस्ट महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत बुधवार, 20 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र तयार होईल. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी बुधवार, 20 ऑगस्ट रोजी 1.58 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.44 वाजता होईल. उदयतिथीनुसार बुध प्रदोष व्रत बुधवार, 20 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धि योग आणि पुनर्वसु नक्षत्र तयार होत आहे. सिद्धी योगाची सुरुवात सकाळी 6.13 वाजता होईल त्यानंतर व्यतिपात योग तयार होईल. पुनर्वसु नक्षत्र हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत 12.27 पर्यंत असेल. त्यानंतप पुष्प नक्षत्र सुरु होईल. मात्र त्यामधील सिद्धी योग हा शुभ योग मानला जाईल. पुनर्वसु नक्षत्राचा अधिपती ग्रह देव गुरु बृहस्पति आहे.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजेसाठी 2 तास 12 मिनिटे हा शुभ मुहूर्त असेल. बुधप्रदोष पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.56 ते 9.7 पर्यंत असेल. या काळामध्ये ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.25 ते 9.5 पर्यंत असतो. मात्र या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त नाही. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक करण्यासाठी वेळ सकाळी ते दुपारी 1.58 पर्यंत आहे. हे व्रत सर्वांसाठी शुभ असणार आहे.
बुध प्रदोषाच्या दिवशी राहू काळ दुपारी 12.24 ते 2.2 पर्यंत राहील. यावेळी हा काळ अशुभ मानला जातो. या काळामध्ये शिवाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते.
जे लोक प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा करतात. त्यांच्यावर महादेवाचे विशेष आशीर्वाद असतात. यामुळे दुःख, रोग, पाप, दुःख इत्यादींचा नाश होतो. जीवनात सुख, समृद्धी, शांती, संपत्ती, मुले, आरोग्य, निर्भयता इत्यादी गोष्टी मिळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)