फोटो सौजन्य- pinterest
कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा आठवा अवतार, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. वाईटाचा नाश करण्यासाठी आणि धार्मिकतेची स्थापना करण्यासाठी भगवानांचा जन्म झाला होता. सर्व राशीच्या लोकांवर श्रीकृष्णांचा आशीर्वाद असला तरी काही राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीपासून सुवर्णकाळ सुरु होत आहे. या लोकांना व्यावसायिक जीवनामध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. तसेच इतर राशींपेक्षा भगवान श्रीकृष्णाची भक्ती जास्त असते. कृष्णाच्या आवडत्या कोणत्या 5 राशी आहेत ते जाणून घ्या
श्रीकृष्णाची सर्वात आवडती रास वृषभ आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे त्याला भौतिक सुखाचा स्वामी म्हटले जाते. या लोकांना नेहमी नशिबाची साथ मिळते. तसेच अनेक प्रकारच्या समस्येतून सुटका होते. सामाजिक क्षेत्रात सहभाग घ्याल. या दिवशी काही खास उपाय केल्याने देखील अधिक फायदा होतो.
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य देवाला भगवान नारायणाचा एक भाग मानले जाते, त्यामुळे हे लोक नेहमी भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाखाली राहतात. त्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदा होऊ शकतो. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगांचे कपडे दान केल्याने फायदा होऊ शकतो.
तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्याला समृद्धी आणि विलासाचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे या राशीच्या लोकांचे सर्व दुःख आणि संकटांपासून सुटका होते. त्यामुळे या लोकांना संघर्षाशी लढण्यासाठी मदत होते. या लोकांना कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. या लोकांनी पंचामृत अर्पण करावे.
धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. जो देवांचा गुरु आहे. या राशीच्या लोकांना ज्ञानाची कमतरता भासत नाही. या ज्ञानात अनेक लोकांना मदत करतात. धनु राशीच्या लोकांचा सन्मान आणि आदर वाढेल. दानधर्म केल्याने सत्कर्मांमध्ये भाग घ्याल. यावेळी चंद्र देवाला जल अर्पण करावे.
मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे. जो देवांचा गुरु आहे. बृहस्पतिला भाग्य, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या लोकांवर नेहमीच श्रीकृष्णाचा आशीर्वाद राहतो. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)