फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला चांगली नोकरी हवी असते, मात्र कधीकधी कठोर मेहनत घेऊन देखील अपेक्षित यश मिळत नाही. पूर्ण तयारी करुन देखील पूर्ण यश मिळत नाही. त्याचप्रमाणे कौशल्य आणि आत्मविश्वासच नाही तर पर्यावरण आणि उर्जेचा समतोल राखणे महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, सभोवतालची ऊर्जेचा तुमच्या कामावर सकारात्मक परिणाम करते. मुलाखतीच्या वेळी योग्य दिशा आणि उपाय तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकता. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळेल. नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना वास्तूच्या काही नियमांचे पालन करणे फायदेशीर ठरु शकते.
वास्तुशास्त्रात, ईशान्य दिशा खूप शुभ मानली जाते. या दिशेचा संबंध ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक उर्जेशी संबंधित आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन ईशान्य दिशेला तोंड करून तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या उपायामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तसेच ताण देखील कमी होऊ शकतो.
मुलाखतीला जाताना खिशामध्ये तुळशीची पाने पाच वाळलेली पाने किंवा एका लहान गठ्ठ्यात काळे तीळ ठेवा. तुळस हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर तीळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होते.
असे मानले जाते की, या दोन्ही गोष्टी वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करतात आणि तुमचे नशीब बळकट करतात. यामुळे मुलाखतीदरम्यान येणाऱ्या आव्हानांना तोंड देणे सोपे होते.
मुलाखतीच्या दिवशी हलक्या पिवळ्या किंवा क्रीम रंगाचे कपडे घाला, त्यामुळे तुमचा लूक आकर्षक वाटू शकतो. तसेच घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि गूळ खा असे करणे शुभ मानले जाते. त्यासोबतच देवाच्या पायांपडून घराबाहेर पडावे.
वास्तूनुसार, तुमचे मन सकारात्मक ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या मनामध्ये वारंवार मुलाखतीबद्दल भीती किंवा नकारात्मक विचार येत असल्यास तुमच्यामधील आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो. मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वतः खात्री करुन घ्या की तुम्ही योग्य तयारी केली आहे का, तुम्ही ज्या संधीच्या शोधात आहात त्यात तुम्ही पात्र आहात का.
मुलाखतीपूर्वीचे वातावरण खूप महत्त्वाचे असते. घराबाहेर पडताना, हळूवार आणि गोड बोला, कोणाशीही वाद घालू नका. त्यावेळी तुमचा मूड शांत आणि स्थिर ठेवा. तुम्ही मुलाखतीला जाताना सकारात्मकतेने गेल्यास तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)