रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यात कापूर जाळण्याची प्रथा केवळ धार्मिक नाही, तर त्यामागे शास्त्रीय आणि मानसिक कारणंही आहेत. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे.कापूर जाळणं म्हणजे नकारात्मक शक्तींचा नायनाट करणं आहे. त्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी कापूर जाळणं शुभ मानलं जातं.
दरवाजा घरात येणाऱ्या ऊर्जेचं प्रवेशद्वार असल्यानं तिथे कापूर जाळल्यास लक्ष्मीची कृपा होते, अशी पुर्वीच्या लोकांची श्रद्धा पुर्वापार चालत आलेली आहे. अध्यात्माप्रमाणे यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. कापूरमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. तो हवेतले सूक्ष्म जंतू कमी करण्यास मदत करतो.कापूर जळल्यावर येणारा सुगंध मेंदूवर थेट परिणाम करतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होतं.संध्याकाळी वातावरणात जडपणा असतो; कापूर तो कमी करतो.
सूर्यास्तानंतर देवघरात तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा देखील वापर करु शकता.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकावी यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. टापटीप नीटनेटकेपण असलेल्या घरात रोगराई होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी दररोज घर स्वच्छ ठेवणं महत्वाच आहे.
आठवड्यातून 1-2 वेळा खडा मीठ मिसळलेलं पाणी घरात पुसायला वापरा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, असं वास्तूशास्त्र सांगतं. वैज्ञानिक याचं कारण पाहिलं तर मीठामध्ये असलेलं सोडीयम जंतूनाशक असतं त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ राहतं.
मानसिक स्वास्थ्य नीट रहावं यासाठी इष्ट देवतेचा मंत्र पठण करणं फायदेशीर आहे. यामुळे अतिविचार नियंत्रित होतात आणि काही वेळापूरतं का होईना मन शांत राहतं. हे एक प्रकारे मेडीटेशन करण्यासारखं आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






