फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, कला आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी शुक्र ग्रह आपल्या राशीमध्ये बदल किंवा नक्षत्र बदल करतो या गोष्टींचा परिणाम कोणत्या ना कोणत्या राशीच्या लोकांवर होतो. खासकरुन हे बदल आर्थिक परिस्थिती आणि सर्जनशील क्षमतांवर परिणाम करतात.
गुरुवार, 26 जून रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या प्रभावशाली कृतिका नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्र संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा दिवस अनुकूल राहील, तर काही राशींच्या लोकांना अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काही राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात तणाव, आर्थिक अडचणी किंवा निर्णयांमध्ये गोंधळ इत्यादी परिस्थितीटा सामना करावा लागू शकतो. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या
कन्या राशीच्या लोकांना नक्षत्र बदलामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सावधानता बाळगावी लागेल. तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय खर्चामध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायात कोणतेही निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्या.
तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या या संक्रमणाचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागू शकते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर एखाद्या छोट्या चुकीमुळे तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.
शुक्र ग्रहांचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुंतागुंतीचे असू शकते. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. कोणतेही निर्णय घेताना वडीलधारी व्यक्ती आणि वरिष्ठांचा सल्ला जरुर घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणामुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. समाजामध्ये लोक तुमच्या बोलण्याला चुकीचे समजू शकतात त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. या लोकांना कर्जाशी संबंधित गोष्टीला तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)