फोटो सौजन्य- pinterest
चाणक्यांनी नीतीशास्त्रात धनसंपत्तीचा योग्य वापर कसा करावा याबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे. पैसा हा केवळ संचयासाठी नसून समाजहितासाठी उपयोगात आणला तरच त्याचे खरे मूल्य वाढते. योग्य ठिकाणी आणि योग्य भावनेने केलेले दान व्यक्तीला केवळ पुण्यच देत नाही, तर सन्मान, प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीही मिळवून देते. कोणत्या गोष्टींचे दान करण्याचा उल्लेख नीतीशास्त्रात केलेला आहे ते जाणून घ्या
चाणक्यांच्या मते, मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्यास कोणीही मागेपुढे पाहू नये. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणात पैसे गुंतवा, परंतु समाजातील ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यांचे शिक्षणदेखील तुम्ही सुनिश्चित केले पाहिजे. तुमच्या मुलांच्या शिक्षणात गुंतवलेले पैसे तुमच्यासाठी दीर्घकाळात फायदेशीर ठरतील. चांगले शिक्षण घेऊन मुले त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणात योगदान देतात. जे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणावर पैसे गुंतवण्यास टाळाटाळ करतात त्यांना भविष्यात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
तुमचे पैसे समाजसेवेसाठी वापरल्याने तुम्हाला मनःशांती देखील मिळते. समाजसेवेत गुंतवलेले पैसे भविष्यात तुम्हाला काही प्रमाणात लाभदायक ठरतात. म्हणूनच, चाणक्याच्या मते, तुमच्या कमाईचा काही भाग समाजसेवेसाठी समर्पित करण्याचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.
तुम्ही तुमच्या पैशाचा वापर गरिबांना किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मदत करण्यासाठी सुज्ञपणे केला पाहिजे. चाणक्यांत्या मते, हे एक चांगले काम मानले जाते आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही ते अत्यंत शुभ आहे. गरिबांना पैसे दान करून तुम्ही एक चांगले काम करता ज्यामुळे तुम्हाला समाजात आदर मिळतो. त्याचवेळी तुम्ही केलेले चांगले काम परत येईल आणि एक दिवस तुम्हाला फायदा होईल.
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या आजारी व्यक्तीला कधी पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्यास तुम्ही आजारी व्यक्तीला मदत करण्यास कधीही मागेपुढे पाहू नये. आजारी व्यक्तीला तुम्ही दिलेली मदत तुम्हाला मानसिक समाधान देते आणि ती व्यक्ती आयुष्यात कधीतरी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आजारी व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आदर मिळतो आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चाणक्यांच्या मते धनाचा योग्य वापर केल्यासच त्याची खरी किंमत वाढते. दान हे केवळ धार्मिक कृत्य नसून सामाजिक जबाबदारी आहे.
Ans: शिक्षणासाठी मदत अन्नदान, धार्मिक व सामाजिक कार्य, गरजू आणि दुर्बल व्यक्तींना सहाय्य
Ans: मंदिर, धर्मशाळा, रुग्णालय किंवा सार्वजनिक उपक्रमांसाठी दिलेले धन समाजहितासाठी उपयोगी पडते. यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढते.






