Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया

मुंबईच्या  गोंधळात देखील असं एक ठिकाण आहे जिथे विठ्ठलाचं मंदिर आहे.खुद्द तुकोबारायांनी या मंदिराचा पाया रचला असं म्हटलं जातं. त्यामुळेच या मंदिरारा प्रतिपंढरपूर असं देखील म्हणतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2026 | 03:28 PM
Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया
Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर,
  • संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया
‘पांडुरंग हरी वासुदेव हरी’ आणि ‘ज्ञानबा तुकाराम’ असा हा जयघोष कुठेही आणि कधीही ऐकला तरी पहिले आठवतं ते आषाढी कार्तिकी विठ्ठलाची वारी. ही आषाढी कार्तिकी वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली अध्यात्मिक परंपरा आहे. दरवर्षी कानाकोपऱ्यातील वैष्णवांचा मेळा पायपीट करत चंद्रभागेच्या तिरी माऊलीच्या भेटीसाठी गोळा होतो. आजवर अनेक कुटुंब असे आहेत जे नित्य नेमाने हा पायंडा सुरु ठेवत आहे. मात्र अनेक जण असे आहेत ज्यांना ऑफिसच्या वारीमुळे आषाढी वारीला जाताना येत नाही. पण तुम्हाला माहितेय का, मुंबईच्या  गोंधळात देखील असं एक ठिकाण आहे जिथे विठ्ठलाचं मंदिर आहे. हे मंदिर साधंसुदं नव्हे तर खुद्द तुकोबारायांनी या मंदिराचा पाया रचला असं म्हटलं जातं. त्यामुळेच या मंदिरारा प्रतिपंढरपूर असं देखील म्हणतात.

मुंबईत विठ्ठल रखुमाईचं प्राचीन मंदिर आहे. ज्याला कित्येक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. मंदिर तसं साधंच पण त्याचं महत्व जास्त आहे ते तुकोबांनी मंदिराचा पाया रचल्यामुळे. याची गोष्ट अशी सांगितली जाते की, मीठाच्या व्यापारासाठी तुकोबा मुंबईत येत असत. असं म्हणतात की या परिसरात मंदिर बांधण्याआधी वडाचं झाड होतं या वडाच्या झाडाखाली बसून तुकोबांनी किर्तन केलं होतं. या ठिकाणी पुर्वी वडाची झाडं होती त्यामुळे मुंबईतल्या या परिसराला वडाळा असं नाव पडलं. सुमारे 400 तुकोबांनी या मंदिराचा पाया रचला.

Varuthini Ekadashi: वल्लभाचार्य नक्की कोण होते? कुठे झाला जन्म जाणून घ्या संपूर्ण कथा

या मंदिराला जितकं महत्व आहे तेवढंच तेथील विठ्ठल मूर्तीची गोष्ट देखील खास आहे. पुर्वीच्या काळी मुघलसाम्राज्य हिंदू देवतांची विटंबना करित म्हणून देवांच्या मुर्त्या कोणी जमिनीत पुरुन ठेवत तर कोणी पाण्यात सोडून देत होते. असं म्हणतात की, वडाळा परिसरातील एक गृहस्थ पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते.त्यावेळी चंद्रभागेच्या तिरावर त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती सापडली. त्यानंतर या मुर्तीची स्थापना मुंबईत करण्यात आली. त्याचबरोबर आणखी दुसरी गोष्ट अशी देखील सांगितली जाते की, वडाळ्याच्या मिठागरात काम करणाऱ्या कामगारांना विठ्ठलाची मूर्ती सापडली तेव्हा स्थानिकांनी या ठिकाणी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. तुकोबांनी ज्या वडाच्या झाडाखाली किर्तन केलं ते वडाचं झाड आजही मंदिरपरीसरात आहे आणि भाविक याची काळजी देखील घेतात.आज या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रतिपंढरपुर म्हणून ओळखलं जातं. इच्छा असूनही वारीला जाऊ शकत नाही असे मुंबईकर या प्रतिपंढरपुरातील विठ्ठालाच्या चरणी नतमस्तक होतात.

Rameshwar Jyotirlinga: काय आहे रामेश्वरस्वामी मंदिराचा रामायणाशी संबंध, रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घ्या

 

 

 

 

 

Web Title: Wadala viththal rakhumai temple pratipandharpur is located in the crowded area of mumbai the foundation of the temple was laid by saint tukoba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • hindu religion
  • Saint Tukaram Maharaj
  • Vithhal Rukmini Temple

संबंधित बातम्या

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
2

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
4

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.