chaitra navratri (फोटो सौजन्य- pinterest)
चैत्र नवरात्रीची सुरवात ३० मार्चपासून होणार आहे आणि याच दिवसाला हिंदू नववर्षचा सुरवात देखील मानले जाते. नवरात्रीच्या ९ दिवसांच्या पूजेत वेग- वेगळ्या रंगाचे कपडे घातले जातात. असे मानले जाते की नवदुर्गाच्या पूजेदरम्यान जर तुम्ही दिवसानुसार कपडे घातले तर आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमची पूजा पूर्ण मानली जाते. जर तुम्ही या भाग्यवान रंगांचे कपडे घालून पूजेमध्ये सहभागी झालात तर आई भगवती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. चला तर मग नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये पूजेसाठी ९ भाग्यशाली रंग कोणते जाणून घेऊयात.
Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीला तयार होत आहे शुभ योग, कलश स्थापनेसाठी उत्तम मुहूर्त
पहिला दिवस
नवरात्रीचा पहिला दिवस खूप खास असतो. हा देवी शैलीपुत्रीचा पूजेचा दिवस आहे. याचा अर्थ आहे कि हा दिवस देवी शैलीपुत्रीचा आहे आणि या दिनी नारंगी रंग घालणं शुभ मानले जाते. हा रंग मंगळचा प्रतीक आहे आणि हा रंग नवीन आशा आणि चांगल्या उर्जेचा आहे.
दुसरा दिवस
दुसऱ्या दिनी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिनी सफेद रंगाचे कपडे घालणं शुभ मानले जाते. सफेद रंग शांतीचा प्रतीक आहे. ते शुद्धतेसह अध्यात्माचे देखील प्रतिनिधित्व करते. सफेद रंग चंद्रमाशी जुडलेला आहे. चंद्रमा शांती आणि थंडावा देते. म्हणून सफेद रंगाचे कपडे नवरात्रीच्या दुसरया दिवशी घातल्याने तुमच्या मनाला शांती भेटेल.
तिसरा दिवस
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचा महत्व आहे. हा रंग शक्ती आणि साहस दाखवतो. आणि हा रंग शनी ग्रहाशी जुडलेला आहे. म्हणून हा स्थिरता आणि विश्वास वाढवतो. देवी चंद्रघंटाची पूजा तिसऱ्या दिवशी होते. लाल रंग भक्ती, शक्ती आणि साहसचा प्रतीक आहे. याचा अर्थ असा की लाल रंग श्रद्धा, ताकत आणि हिम्मत दाखवतो. म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिनी लाल रंगाचे कपडे घालून पूजा करावे.
चवथा दिवस
नवरात्रीच्या चवथ्या दिवशी देवी कुष्मांडाची आराधना केली जाते. या दिवशी रॉयल ब्लु रंगाचा महत्व आहे. रॉयल ब्लु रंग घातल्याने स्थिरता, खोल विचार आणि दैवी ऊर्जा प्रसारित होते. बृहस्पतीशी जुडलेला हा रंग बुद्धी आणि ज्ञानेला विकसित करते. म्हणून नवरात्रीच्या चवथ्या दिवशी रॉयल ब्लु रंग घालणे चांगले समजले जाते.
पाचवा दिवस
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाताची पूजा केली जाते. या दिनी पिवळा रंग घालणे चांगला समजले जाते. हा रंग उम्मीद, ज्ञान आणि खुशीचा प्रतीक आहे. बुध ग्रहाचा प्रतीक हा रंग समृद्धी आणि सुख शांती आणतो. असं म्हंटल जात कि पिवळा रंग घातल्याने घरात सुख-शांती येते. हा रंग बुध ग्रहाशी जुडलेला आहे.
सहावा दिवस
नवरात्रीच्या सहाव्यादिनी देवी कात्यायनीची पूजा करण्यात येते. या दिवशी हिरव्या रंगाचा महत्व आहे. हिरवा रंग नवीन ऊर्जा, समृद्धी आणि प्रकृतीशी जुडलेला आहे. हा राहू ग्रहाशी देखील जुडलेला आहे आणि नकारात्मक ऊर्जेशी देखील वाचवतो. मान्यता आहे की नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजा केल्याने कुवारी कन्येला लवकरात लवकर योग्य वर मिळतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
सातवा दिवस
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्यात येते. या दिनी ग्रे रंग धारण करणं शुभ मानले जाते. कारण हा रंग साहस आणि शक्तीचा प्रतीक आहे. याचा अर्थ ग्रे रंग घातल्याने हिम्मत मिळते आणि हा रंग सूर्याशी जुडलेला आहे. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. घरात सुख समृद्धी वाढते आणि सदैव आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो.
आठवा दिवस
नवरात्रीच्या आठवे दिवस देवी महागौरीची पूजा करण्यात येते. या दिनी जांभळा रंग घालणे शुभ मानले जाते. जांभळा रंग घातल्याने शांती आणि बढती मिळते. हा रंग शुक्राशी जुडलेला आहे. हा रंग प्रेम आणि सौंदर्याचा प्रतीक आहे. तुमच्या घरात समृद्धी मिळते आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त होते.
नववा दिवस
राम नवमीच्या दिनी देवी सिध्दिदात्रीची पूजा करण्यात येते. हा नवरात्रीचा आखिरी दिवस असतो. हा दिवस मोरपंखी हिरवा रंग घालणे चांगले समजले जातात. हा रंग सुंदरता, समृद्धी आणि चांगल्या विचाराचे प्रतीक आहे. तुमच्या मनाला अनादी करतो. मोरपंखी हिरवा रंग केतूशी जुडलेला आहे. हा रंग आध्यात्मिक विकास आणि देवाशी जोडण्यास मदत करते. म्हणून राम नवमीला या रंगाचा महत्व आहे.
Astrology: यावेळी शिंका येणे मानले जाते शुभ, काय आहे शिंकण्याचा नेमका अर्थ