पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव (Photo Credit - X)
Australia win the 1⃣st ODI by 6 wickets. We shift our focus to the next match in Hobart. Scorecard ▶️ https://t.co/yUKqC8iLON#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/cVOLwrqqeU — BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2026
या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मानधन, हरमनप्रीत कौर आणि काशवी गौतम यांनीच चांगली खेळी केली. मानधनाने ६८ चेंडूत ७ चौकारांसह ५८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ८४ चेंडूत ३ चौकारांसह ५३ धावा केल्या. ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या काश्वी गौतमने ४४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४३ धावा केल्या. रिचा घोषनेही २३ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज १० धावांपेक्षा कमी धावा काढत बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने ३ आणि मेगन शटने २ बळी घेतले.
२१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया कधीही दबावाखाली दिसला नाही. त्यांच्या सलामीवीर, एलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. फोबी लिचफिल्ड ३२ चेंडूत ३२ धावा करून बाद झाली, तिने तिच्या डावात सहा चौकार मारले. जॉर्जिया वॉल गोल्डन डकवर बाद झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५५ धावांवर आपला दुसरा विकेट गमावला. तथापि, सुरुवातीच्या दोन विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले.
एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. कर्णधार एलिसा हिली ७० चेंडूत ५० धावा काढून बाद झाली. त्यानंतर बेथ मुनीने ७९ चेंडूत ७६ धावा केल्या, त्यात पाच चौकार आणि दोन षटकार मारले. ऑस्ट्रेलियाने २१५ धावांचे लक्ष्य ३८.२ षटकात सहा विकेट्स गमावून पूर्ण केले. टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस चरणीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
“हो, Sachin Tendulkar वर अन्याय…”, अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी






