Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?
पूर्वी बाईक खरेदी करताना आपल्याला टॅक्स म्हणून 28 टक्के जीएसटी भरावा लागत होता. मात्र, 22 सप्टेंबर पासून 2025 पासून जीएसटी बदल झाल्याने आता आपल्याला फक्त 18 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. केंद्र सरकारच्या या र्निणयामुळे दुचाकी खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच तर नवरात्रीत दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली होती. आता दिवाळी असल्यामुळे पुन्हा एकदा देशातील दुचाकी बाजारात मोठी खरेदी विक्री सुरु आहे.
भारतीय बाजारात अनेक बाईक्स लोकप्रिय आहेत. अशाच दोन बाईक म्हणजे Honda SP125 आणि Bajaj Pulsar 125. अलीकडे झालेल्या GST कपातीनंतर दोन्ही बाइक्सच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. जर तुम्ही दररोजच्या वापरासाठी स्टायलिश आणि उत्तम मायलेज देणारी बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन बाइक्सपैकी कोणतीही एक योग्य पर्याय ठरू शकतात. चला तर मग दोन्ही बाईक्सच्या नव्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Toyota Hyryder ची चावी डायरेक्ट तुमच्या खिश्यात! EMI फक्त…
Honda SP125 ची नवी एक्स-शोरूम किंमत आता 85,564 ते 94,000 रुपयांदरम्यान झाली आहे. तर Bajaj Pulsar 125 ची किंमत 79,048 ते 86,444 रुपयांदरम्यान निश्चित केली गेली आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. आता पाहूया दोन्ही बाइक्सच्या पॉवरट्रेन आणि मायलेजची माहिती.
Honda SP125 मध्ये 123.94cc सिंगल-सिलेंडर, BS6 OBD2-कॉम्प्लायंट PGM-FI इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 8kW पॉवर आणि 10.9Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाइक 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 65km पर्यंत चालू शकते. म्हणजेच, टाकी फुल केल्यास तुम्ही 700km पर्यंत प्रवास करू शकता.
Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा
फीचर्सच्या बाबतीत, Honda SP125 मध्ये फुली डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअल-टाइम फ्यूल इकॉनॉमी, डिस्टन्स-टू-एम्प्टी, गिअर पोझिशन इंडिकेटर, USB चार्जिंग पोर्ट, साइलेंट स्टार्ट सिस्टम आणि LED हेडलाइट सारखी आधुनिक वैशिष्ट्ये दिली आहेत.
Bajaj Pulsar N125 मध्ये 124.45cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो स्मूथ राइडिंग अनुभव देतो.
या बाईकचे ARAI सर्टिफाइड मायलेज 64.75kmpl इतके आहे. तसेच 12 लिटर फ्यूल टँक असल्याने फुल टँकमध्ये ही बाइक सुमारे 600km अंतर पार करू शकते.
Bajaj Pulsar 125 मध्ये डिजिटल क्लस्टर, स्प्लिट सीट ऑप्शन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट, आणि हॅलोजन हेडलाइट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.