Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
१. दूध
२. दही
३. तूप
४. मध
५. साखर किंवा खडीसाखर
या पाचही गोष्टी एकत्र केल्या की पंचामृत तयार होतं. काही ठिकाणी यात थोडं गंगाजल आणि तुळशीचं पान पण टाकतात.
हिंदू धर्मात पंचामृत फक्त एक मिश्रण नाही, ते शुभतेचं प्रतीक आहे. देवाला जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा पाण्याने, दुधाने आणि पंचामृताने आंघोळ घालतो. असं मानतात की पंचामृताने देवाला आंघोळ घातली की देव लवकर प्रसन्न होतो. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. घरात सुख, शांती आणि पैसा टिकून राहतो. Panchamrit:
दूध हे पवित्रतेचं प्रतीक आहे. मन स्वच्छ ठेवतं.
दही हे समृद्धीचं आणि वाढीचं प्रतीक आहे.
तूप हे शक्तीचं आणि तेजाचं प्रतीक आहे. शरीरात ताकद देतं.
मध हा गोडव्याचा प्रतीक आहे. आपल्या बोलण्यात आणि नात्यात गोडवा यावा म्हणून.
आणि साखर ही आनंदाची प्रतीक आहे. आयुष्यात गोडवा राहावा म्हणून.म्हणजे या पाच गोष्टींमध्ये सगळं आयुष्य आलं.
पुराणात सांगितलं आहे की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा समुद्रातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. त्यातून शेवटी अमृताचा कलश बाहेर आला. त्या अमृतासारखंच हे पंचामृत आहे असं मानतात. म्हणूनच ते इतकं पवित्र आहे.भगवान विष्णू, भगवान शंकर, श्रीकृष्ण, गणपती या सगळ्या देवांच्या पूजेत पंचामृताला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. शिवलिंगावर तर पंचामृताचा अभिषेक आवर्जून करतात.
Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
पूजा झाल्यावर गुरुजी सगळ्यांना हातावर थोडं पंचामृत देतात. ते आपण डोळ्यांना लावतो आणि पिऊन घेतो. असं का?तर मान्यता अशी आहे की देवाला अर्पण केलेलं पंचामृत हे सामान्य राहत नाही, ते तीर्थ बनतं. ते प्यायल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा तीनही गोष्टी शुद्ध होतात. पोटातले आजार बरे होतात आणि मनातली नकारात्मकता निघून जाते.म्हणूनच पंचामृत हे फक्त खाण्याची गोष्ट नाही. ती एक भावना आहे. भक्ती, पवित्रता आणि समृद्धी यांचा संगम म्हणजे पंचामृत.पुढच्या वेळी पूजेत पंचामृत मिळालं की ते फक्त प्रसाद म्हणून पिऊ नका, त्यामागचा हा मोठा अर्थ पण लक्षात ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






