Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Panchamrit: हिंदू धर्मातील विविध पूजांमध्ये पंचामृताला विशेष स्थान आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर किंवा खडीसाखर या पाच पदार्थांपासून पंचामृत तयार केले जाते. काही परंपरांमध्ये त्यात तुळशीचे पान आणि गंगाजलही मिसळले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘अमृत’ म्हणजे पवित्र अमृत, असा त्याचा धार्मिक अर्थ सांगितला जातो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 05:28 PM
Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून पंचामृत तयार होते
  • देवाच्या अभिषेकात पंचामृताला विशेष महत्त्व
  • पंचामृत प्रसाद म्हणून भक्तांना दिले जाते
Panchamrit Importance: आपण कोणतीही पूजा केली, सत्यनारायण असो, गणपतीची पूजा किंवा महादेवाचा अभिषेक असो, एक गोष्ट सगळीकडे पंचामृत असते. देवाला आंघोळ घालताना पण पंचामृत वापरतात आणि नंतर तेच सगळ्यांना प्रसाद म्हणून पण देतात. पण हे पंचामृत इतकं पवित्र का मानतात? ते नेमकं कशापासून बनतं आणि त्याचा अर्थ काय? हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. पंचामृत या नावातच सगळा अर्थ आहे. पंचामृत हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे देवांचा पवित्र रस जो कधीच संपत नाही. म्हणजे पाच अमृतासारख्या पवित्र गोष्टी एकत्र करून जे बनतं ते पंचामृत.

हे पाच पदार्थ कोणते? तर

१. दूध
२. दही
३. तूप
४. मध
५. साखर किंवा खडीसाखर

या पाचही गोष्टी एकत्र केल्या की पंचामृत तयार होतं. काही ठिकाणी यात थोडं गंगाजल आणि तुळशीचं पान पण टाकतात.

पूजेत पंचामृत इतकं महत्त्वाचं का आहे?

हिंदू धर्मात पंचामृत फक्त एक मिश्रण नाही, ते शुभतेचं प्रतीक आहे. देवाला जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा पाण्याने, दुधाने आणि पंचामृताने आंघोळ घालतो. असं मानतात की पंचामृताने देवाला आंघोळ घातली की देव लवकर प्रसन्न होतो. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. घरात सुख, शांती आणि पैसा टिकून राहतो. Panchamrit:

प्रत्येक पदार्थाचा एक वेगळा अर्थ पण सांगितला आहे.

दूध हे पवित्रतेचं प्रतीक आहे. मन स्वच्छ ठेवतं.
दही हे समृद्धीचं आणि वाढीचं प्रतीक आहे.
तूप हे शक्तीचं आणि तेजाचं प्रतीक आहे. शरीरात ताकद देतं.
मध हा गोडव्याचा प्रतीक आहे. आपल्या बोलण्यात आणि नात्यात गोडवा यावा म्हणून.
आणि साखर ही आनंदाची प्रतीक आहे. आयुष्यात गोडवा राहावा म्हणून.म्हणजे या पाच गोष्टींमध्ये सगळं आयुष्य आलं.

यामागची पौराणिक गोष्ट काय?

पुराणात सांगितलं आहे की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा समुद्रातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. त्यातून शेवटी अमृताचा कलश बाहेर आला. त्या अमृतासारखंच हे पंचामृत आहे असं मानतात. म्हणूनच ते इतकं पवित्र आहे.भगवान विष्णू, भगवान शंकर, श्रीकृष्ण, गणपती या सगळ्या देवांच्या पूजेत पंचामृताला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. शिवलिंगावर तर पंचामृताचा अभिषेक आवर्जून करतात.

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

प्रसाद म्हणून पंचामृत का देतात?

पूजा झाल्यावर गुरुजी सगळ्यांना हातावर थोडं पंचामृत देतात. ते आपण डोळ्यांना लावतो आणि पिऊन घेतो. असं का?तर मान्यता अशी आहे की देवाला अर्पण केलेलं पंचामृत हे सामान्य राहत नाही, ते तीर्थ बनतं. ते प्यायल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा तीनही गोष्टी शुद्ध होतात. पोटातले आजार बरे होतात आणि मनातली नकारात्मकता निघून जाते.म्हणूनच पंचामृत हे फक्त खाण्याची गोष्ट नाही. ती एक भावना आहे. भक्ती, पवित्रता आणि समृद्धी यांचा संगम म्हणजे पंचामृत.पुढच्या वेळी पूजेत पंचामृत मिळालं की ते फक्त प्रसाद म्हणून पिऊ नका, त्यामागचा हा मोठा अर्थ पण लक्षात ठेवा.

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Why is panchamrut considered amrut nectar learn about its significance in worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
1

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
2

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
3

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
4

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.