Dinvishesh : 'भारताचे पितामह' म्हणून ओळखले जाणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : आज भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मरणदिन आहे. ४ सप्टेबंर १८२५ रोजी मुंबईतील एका पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते एक थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांना भारताचे पितामह म्हणजे भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणूनही ओळखले जाते. ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले होते. त्यांनी ड्रेन थेअरी मांडून ब्रिटनच्या आर्थिक शोषणाचा पर्दाफश केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ते तीन वेळा अध्यक्ष राहिले होते. त्यांनी स्वातंत्र्य, शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. जे आजही प्रेरणादायी ठरते. अशा या महान नेत्याचे निधन ३० जून १९१७ रोजी झाले.
30 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
30 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






