Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाचा विचार केल्यास, आतापर्यंत मुख्यत्वे एकदा महत्त्वाची पोटनिवडणूक झाल्याची नोंद आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 23, 2026 | 04:50 PM
35 Years Later, Baramati Faces Another Assembly Bypoll; A Look Back at the 1991 Political Crisis

35 Years Later, Baramati Faces Another Assembly Bypoll; A Look Back at the 1991 Political Crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार हे बारामती लोकसभेतून विजयी झाले होते.
  • शरद पवार केंद्रात गेल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती
  • अजित पवार यांनी निवडणूक लढवली आणि ९० टक्क्यांहून अधिक मते मिळवून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला
अनुराधा धावडे, Baramati Assembly bypoll Elections 2026: राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या जागेवर निवडणूक लढवत आहेत. खरंतर बारामतीचे राजकारण हा राज्यात सर्वात चर्चेत असलेला विषय असतो. गेल्या ६० वर्षांपासून बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.

१९६७ साली शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर बारामतीत अनेकदा निवडणुका झाल्या. या काळात सुरुवातीचे काही वर्षे शरद पवार निवडणूक लढवली. त्यांनंतर त्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनीदेखील काकांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय डावपेचामुळे बारामतीचे राजकारण कायम चर्चेत राहिले. शरद पवार राज्यसभेवर गेल्यानंतर बारामतीच्या राजकारणात अजित पवार यांचा दबदबा चांगलाच वाढला होता. पण त्यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीवर जणू दु:खाचा डोंगर कोसळला. आज बारामतीच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीवरून यापूर्वी बारामतीत पोटनिवडणूक केव्हा झाली होती. असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?

बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाचा विचार केल्यास, आतापर्यंत मुख्यत्वे एकदा महत्त्वाची पोटनिवडणूक झाल्याची नोंद आहे.

 

बारामती लोकसभा पोटनिवडणूक (१९९१)

बारामतीमध्ये सर्वात गाजलेली पोटनिवडणूक १९९१ मध्ये झाली होती. १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. पण त्यानंतर काही महिन्यातच शरद पवार यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनी केंद्रातील संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यात परतण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने बारामती लोकसभेची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार यांनी निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले. अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात परतले. नोव्हेंबर १९९१ मध्ये झालेल्या या विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी ऐतिहासिक ९०% पेक्षा जास्त मते मिळवून विजय मिळवला होता. तेव्हापासून २०२६ पर्यंत (निधनापर्यंत) ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’; रोहित पवारांचे खळबळजनक विधान

 

विधानसभा पोटनिवडणुकीची स्थिती

विधानसभेच्या बाबतीत, १९६७ पासून हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. शरद पवार किंवा त्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात प्रामुख्याने सार्वत्रिक निवडणुकाच पार पडल्या असून, एखाद्या आमदाराच्या निधनामुळे किंवा अपात्रतेमुळे मोठी पोटनिवडणूक लागल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, बारामतीच्या राजकीय इतिहासात १९९१ ची लोकसभा पोटनिवडणूक ही सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची घटना मानली जाते.

बारामतीची बदललेली राजकीय समीकरणे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली. या लढतीमुळे पवार विरुद्ध पवार अशी लढत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पण अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात मोठे बदल बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीला शरद पवार यांनी पाठिंबा दिला. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार यांनीदेखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार केला.

1991 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी एकहाती विजय मिळवला होता. आतापर्यंत बारामतीची एकही निवडणूक शरद पवार यांच्या अनुपस्थितीत झाली नाही. यावेळी पहिल्यांदाच बारामतीच्या निवडणुकीत शरद पवार यांनी मतदान केले नाही. सुनेत्रा पवार महायुतीतून ही निवडणूक लढवत असल्या तरी शरद पवार यांनी या निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण त्या किती मताधिक्याने निवडून येतील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

तब्बल ३५ वर्षांनंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. १९९१ नंतर बारामतीत विधानसभा किंवा लोकसभेसाठी अशा प्रकारची मोठी पोटनिवडणूक झाली नव्हती. त्यामुळे २०२६ ची ही निवडणूक बारामतीच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

 

Web Title: 35 years later baramati faces another assembly bypoll a look back at the 1991 political crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Assembly bypoll Elections 2026
  • Baramati by-election
  • Baramati Politics
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘आजोबा लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट
1

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘आजोबा लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…
2

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…

Baramati By-Election: जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?
3

Baramati By-Election: जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?

Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?
4

Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.