• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Biggest Hindu Festival Information And Imporatnce About Diwali 2024 In Marathi

आनंदाचा…उत्साहाचा अन् मांगल्याचा सण दीपावली; प्रत्येक दिवसाचे महत्त्व तरी काय?

हिंदू संस्कृती महत्त्वाचा सणांपैकी एक म्हणजे दीपावली. दिव्यांच्या आरासने प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकणारा हा सण म्हणजे दिवाळी. फराळ, फटाके, दिवे आणि नात्यांमधील प्रेम घेऊन येणाऱ्या या सणाची माहिती देणारा हा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 30, 2024 | 11:40 AM
diwali celebration information of diwali 2024

हिंदू सणाती सर्वात मोठा सण दीपावलीची माहिती देणारा हा लेख (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रिती माने :  हिंदू संस्कृतीमध्ये सण, परंपरा आणि अनेक समृद्ध रितीरिवाज आहेत. त्यातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. आनंदाचा..उत्साहाचा आणि मांगल्याचा सण म्हणजे दीपावली. दिव्यांच्या झगमगासाठी हा सण ओळखला जातो. दीपावली या शब्दाचा अर्थ देखील दिव्यांची माळ असा होतो. या दिव्यांच्या प्रकाशातून ज्याप्रमाणे सारा परिसर उजळून निघतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील षडरिपू, दुःख व अज्ञानरुपी अंधार ज्ञानाच्या व सुखाच्या प्रकाशाने नाहीसा व्हावा आणि सुख समृद्धी लाभावी या अर्थाने दिवाळी साजरी केली जाते.

अहंकारी लंकापती रावणाचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी पराभव केला आणि धर्माचा विजय झाला. प्रभू राम लंकेहून अयोध्येमध्ये परत आले. त्यांच्या हा विजय वाईट प्रवृत्तीवर धर्माचा, सत्याचा विजय असे मानले जाते. या विजयाचे प्रतिक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यामध्ये साजरी केली जाणारी ही पाच दिवस साजरी केली जाते. या प्रत्येक दिवसाचे विशिष्ट असे महत्त्व आहे.

दिवाळीचा पहिला दिवा अर्थात पहिला दिवस वसुबारस असतो. आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी येणाऱ्या या दिवसाला गोवत्सद्वादशीस असे देखील संबोधले जाते. हा दिवस एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे. यामुळे प्रत्येकाच्या दारी सुखसमृद्धीची साक्ष देत उभ्या असणाऱ्या गायवासराला या दिवशी पुजले जाते. दरवर्षी प्रेमाने आपले दुध शेतकऱ्यांना देऊन त्यांचे घर नंदनवन करणाऱ्या गायवासरासाठी या दिवशी पुरणपोळीचा घाट घातला जातो. त्यांची पूजा करुन बळराजा त्यांचे पाद्यपूजन करुन आणि नैवेद्य चारुन त्यांना एकप्रकारे धन्यवाद देत असतो. वसुबारस सणामुळे आपल्या संस्कृतीमध्ये असणारे गाय वासराचे महत्त्व अधोरेखित होते.

आरोग्य धनसंपदा

दिवाळीतील दुसरा दिवा म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जाणारा धनतेरस. हा दिवस खास करुन धन्वंतरी देवाला समर्पित केला जातो. धन्वंतरी वैद्यकीय क्षेत्रातील देव समजले जातात. या दिवशी डॉक्टरी क्षेत्रातील लोक धन्वतंरी देवाची मनोभावे पुजा करताता.  दिवाळीतील हा दुसरा धनतेरस दिवस देखील आपल्याला मोलाची शिकवण देतो. ती म्हणजे प्रत्येकासाठी खरे धन हे आरोग्य आहे. आरोग्याची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे देखील धनतेरस मधून या दिवसामधून सांगितले जाते. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

नरक चतुर्दशी

दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. कार्तिक महिन्यांच्या कृष्णा पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे. पहाटेच्या प्रहरी लवकर उठून सुगंधी तेलाने व उटणं लावून प्रसन्न अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग लाभतो अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. या दिवशी सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यावर नरकामध्ये जावे लागते अशी समज आहे. यामागे एक आख्यायिका आहे. श्रीमद्भागवतपुराणानुसा नरकासुर हा दुष्ट देवांचा व स्त्रीयांचा छळ करु लागला. त्यांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. हे श्रीकृष्णाला समजताच त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे…

diwali celebration information of diwali 2024

लक्ष्मीपूजन

घरातील लक्ष्मीचा सन्मान लक्ष्मीपूजन

दिवाळीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येच्या दिवशी सारी सृष्टी ही दिव्यांच्या प्रकाशामध्ये प्रज्ज्वलित होते. वर्षातील अनेक महत्त्वाच्या पौर्णिमा व अमावस्येमधील लक्ष्मीपूजन या अमावस्येला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते. हे दिवे परिसरासह आयुष्य देखील प्रकाशमान करतात. या मधून आपाल्याला वेगळीच उर्जा आणि शक्ती लाभते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि धनाचे प्रतिक असणाऱ्या कुबेराची पुजा अर्चना केली जाते. घरातील सर्व सोने चांदी आणि पैशाची पुजा केली जाते. घरातील धनधान्य वृद्धींगत होत जावो अशी मनोकामना देखील केली जाते. यादिवशी व्यापारी वर्गाचे नवीन वर्षे सुरु होते. लक्ष्मीपूजन हा सण लक्ष्मी देवीला समर्पित केलेला आहे. या दिवशीच समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली आणि भगवान विष्णू सोबत त्यांचा विवाह झाला. यामुळे देखील लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यादिवशी माता लक्ष्मी सर्वत्र भ्रमण करुन तिच्या मनोभावना आराधना करणाऱ्या भक्ताला कृपाप्रसाद देते असे मानले जाते. दिवाळीच्या या दिवशी सर्वत्र आनंददायी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. फटाक्यांची आतीषबाजीने सारे विश्व दमदुमून जाते. सुखाची नांदी होते आणि आनंदाची छाया पसरते.

पवित्र नात्याला समर्पित – बलिप्रतिपदा

दिवाळी हा सणातील पुढचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. सणांच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात. मने जुळतात. नात्यांमधील प्रेम वाढते. पाडवा हा दिवस पती पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रेमाला, समर्पणाला अर्पित केलेला आहे.. हा दिवस लक्ष्मीनारायणाचा जोडा असे संबोधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवरा बायकोसाठी आनंदाचा क्षण असतो. पत्नी नवऱ्याचे औक्षण करते तर पती तिला ओवाळणी देतो. बलिप्रतिपदा या दिवशी बळराजाच्या अर्थात शेतकऱ्याच्या घरी पूजन केले जाते. ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ अशा घोषणा दिल्या जातात. पाडवा हा एकत्र पवित्र दिवस असून साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे.

diwali celebration information of diwali 2024

भाऊबीज

भावा बहिणींचा प्रेमाचा भाऊबिज

या सणामध्ये प्रत्येक नात्याचे जतन व पूजन केले जाते. यामध्ये बंधु भगिनीच्या पवित्र नात्याला समर्पित असा भाऊबिज दिवस आहे. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी अभ्यंग स्नान करुन बहिण पाटावर रांगोळी काढते आणि भावाचे औक्षण करते. भाऊ देखील बहिणीला प्रेमाने भेट देतो. बहिण भावाचे नाते हे नेहमी अनोखे आणि निखळ प्रेमाने ओथंबलेले राहिले आहे. दिवाळीमध्ये या नात्याचे देखील पूजन होते.  प्रत्येक घरामध्ये आनंदाची बहार घेऊन येणारा दिवाळी सण हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सण आहे. यानिमित्ताने नातलग एकत्र येतात आणि हा आनंद व्द्यगुणित करतात. प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या या पाच दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक भागामध्ये तेथील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते.

Web Title: Biggest hindu festival information and imporatnce about diwali 2024 in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2024

संबंधित बातम्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
1

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
2

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Diwali Bonus:   आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर
3

Diwali Bonus: आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

‘यात्री कृपया ध्यान दे!’ आता मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे चालवणार 12000 स्पेशल ट्रेन
4

‘यात्री कृपया ध्यान दे!’ आता मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे चालवणार 12000 स्पेशल ट्रेन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट

Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

IND vs WI Toss Update : वेस्ट इंडिडच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण, निर्दय हत्या; रुमाल ठरला घातक शस्त्र, 8 वर्षांनंतर आरोपींना जन्मठेप कायम

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण, निर्दय हत्या; रुमाल ठरला घातक शस्त्र, 8 वर्षांनंतर आरोपींना जन्मठेप कायम

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.