फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies Toss Update : भारताचा कसोटी संघ आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय कसोटी संघ आजपासून त्यांच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. आशिया कप मध्ये विजय मिळवल्यानंतर भारताचा संघ हा शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना हा नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंड मध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या युवा संघाने कमालीची कामगिरी करून सर्वांनाच धक्का दिला होता. ही मालिका अनिर्णीत राहिली होती पण टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंड समोर याप्रकारे कामगिरी केली ती नक्कीच कौतुकास्पद होती. वेस्टइंडीज संघाने मागील काही वर्षांमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही पण वेस्टइंडीजचा इतिहास हा ऐतिहासिक कामगिरीचा आहे.
यशस्वी जयस्वाल केएल राहुल या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर कमालीची कामगिरी केली होती. मोहम्मद सिराजने कमालीचे गोलंदाजी करत भारतीय संघाला शेवटच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. ऋषभ पंत हा जखमी असल्यामुळे त्याच्या जागेवर जगदीशन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत करून नायरच्या जागेवर देवदत्त पडिकल याला संधी मिळाली आहे.
West Indies win the toss and elect to bat first in the 1st Test against #TeamIndia For more updates – https://t.co/Dhl7RtjvWY #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/0aTIgdLXD7 — BCCI (@BCCI) October 2, 2025
इंग्लंड दौऱ्यावर कुलदीप यादव ला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे आता तो कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी फक्त गोलंदाजीत नाही तर फलंदाजी देखील अविश्वसनीय कामगिरी करत भारतीय संघाला अडचणीमधून बाहेर काढले होते. प्रसिद्ध कृष्णा त्याचबरोबर आकाश दीप यांनी देखील चांगली कामगिरी केली होती पण आकाशदीप याला या कसोटी मालिकेमध्ये स्थान मिळालेले नाही.
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
टेगेनारिन चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अॅलिक अथांजे, ब्रँडन किंग, शाई होप, रोस्टन चेस (कर्णधार), जेडेन सील्स, खॅरी पियरे, जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), जोहान लायन, जस्टिन ग्रीव्हज,