• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Chatushringi Devi Temple On Senapati Bapat Road In Pune Navaratri 2024

माळ पहिली : चार शिखरांमध्ये वसलेली पुण्यातील चतुर्श्रुंगी देवी

देशभरामध्ये आदिशक्ती देवीची आराधना केली जात आहे. नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून भाविकांची देवीच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील सेनापती बापट रोडवरील चतुर्श्रुंगी देवीचा महिमा आणि या मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. देवीची माहिती देणारा नवरात्री विशेष हा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 03, 2024 | 03:06 PM
chatushrungi Devi Temple navaratri 2024

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील चतुःशृंगी देवीच्या मंदिराची माहिती देणारा लेख (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रिती माने :  शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. स्त्री शक्तीचा गजर आणि जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो. पुण्यामध्ये आदिशक्तीची अनेक मंदिरं आहे. त्यातील आपले वेगळेपण जपणारे मंदिरं म्हणजे चतुःशृंगी मंदिर. पुणे विद्यापीठाजवळ सेनापती बापट रोडवर असलेले हे मंदिर पुण्यातील देवीच्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. नवरात्री उत्सवामध्ये भक्तांची मोठी गर्दी होणाऱ्या या चतुःशृंगी मंदिराचा परिसर अत्यंत देखणा आहे. लाल मातीचे टेकडीवरील हे मंदिर 350 वर्षांपेक्षा अधिक जुने आहे.

वणीची सप्तःशृंगी आणि पुण्याची चतुःशृंगी देवी भक्तगणांमध्ये लोकप्रिय आहे. देवीच्या या नावाला खास अर्थ आहे. चतुःशृंगी या शब्दाची उत्पत्ती चट्टू या शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ चार शिखरे असलेला टेकडी असा होता. हे चतुःशृंगी देवीचे मंदिर उंच अशा शिखरावर असून त्याला चार टेकड्या आहेत. जवळपास 150 पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. चतुःशृंगी मंदिरामध्ये देवीची नेत्रदीपक शेंदूरी मूर्ती आहे. चतुःशृंगी देवीला अंबरेश्वरी देवी असेही म्हटले जाते. चांदीच्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या देवीचे रुप लोभसवाणे असून डोळे लक्षवेधी आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणरायाची देखील छोटी मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये मंदिराच्या आवारामध्ये जत्रा भरते.

पुण्यातील ही चतुःशृंगी देवी स्वयंभू अशी आहे. पेशवाईच्या काळापासून या देवीचे अस्तित्व आहे. पेशवे काळात एक दुर्लभ शेठ नावाचे सावकार होते. त्यांनी अगदी पेशव्यांनी देखील युद्धकाळामध्ये मदत केली होती. देवीचे निसिम्म भक्त असलेले दुर्लभ शेठ यांनी वणीच्या देवीची मनभावे सेवा केली. दर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पुण्याहून सप्तःशृंगी देवीची यात्रा केली. पण त्यांना वृद्धपकाळाने ही यात्रा खंडित करावी लागली, याचे दुःख त्यांच्या मनाला सलत होते. त्यानंतर देवीने साक्षात दुर्लभ शेठ यांच्या स्वप्नामध्ये येऊन संकेत दिला.

दुर्लभ शेठ यांच्या स्वप्नामध्ये देवीने त्यांना दृष्टांत दिला. एका जागेवर उत्खनन केले तर त्यामध्ये तांदळा स्वरूपाची मूर्ती सापडेल, त्याची पूजा करा, असे स्वप्न त्यांना पडले. उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी खरंच देवीची मुखवटा असलेली मूर्ती सापडली. अशाप्रकारे पुण्यामध्ये चतुःशृंगी देवी अवतरली. आजही लाखो भक्तगण चतुःशृंगी देवीची मनोभावे पूजा करतात. मंदिराचा परिसर देखील निसर्गरम्य असून पुणे शहराच्या वेशीवर हे मंदिर असून देवी रक्षा करत असल्याची भावना श्रद्धाळूंमध्ये आहे. लाल रंगांचे दगडी बांधकाम असलेले हे पुण्यातील चतुःशृंगी देवी मंदिर देवीच्या भक्तांचे श्रद्धास्थान आहे. ज्यांना वणीला जाऊन सप्तःशृंगी देवीचे दर्शन घेता येत नाही तर भक्तीभावाने पुण्यातील चतुःशृंगी देवी पुढे नतमस्तक होतात.

Web Title: Chatushringi devi temple on senapati bapat road in pune navaratri 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • Navratri festival

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.