मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा 'या' पद्धतीने करा वापर
स्मार्टफोनमधील ‘एअरप्लेन मोड’ हे फिचर आपण सहसा तेव्हाच वापरतो जेव्हा आपण विमानातून प्रवास करतो किंवा आपल्याला कोणाचे फोन नको असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हे फिचर केवळ विमानापुरते मर्यादित नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात एअरप्लेन मोडचा वापर करून तुम्ही तुमची बॅटरी वाचवू शकता, फोन वेगाने चार्ज करू शकता. या छोट्याशा बटणाचे मोठे फायदे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला
जेव्हा तुमच्या फोनचे नेटवर्क, डेटा, चाय-फाय आणि ब्लूटूथ सुरू असते, तेव्हा बॅटरीवर मोठा ताण येतो. जर तुमची बॅटरी संपत आली असेल आणि आसपास चार्जिंगची सोय नसेल, तर एअरप्लेन मोड ऑन करा. यामुळे फोनचा वीज वापर कमी होतो आणि बॅटरी जास्त काळ टिकते.
जर तुम्हाला घाई असेल आणि फोन लवकर चार्ज करायचा असेल, तर चार्जिंगला लावताना एअरप्लेन मोड ऑन करा. यामुळे बैकग्राउंडला चालणाऱ्या नेटवर्क अॅक्टिव्हिटी बंद होतात आणि फोन नेहमीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने चार्ज होतो.
अभ्यास करताना किंवा ऑफिसचे महत्त्वाचे काम करताना सतत येणारे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल्स तुमचे लक्ष विचलित करतात. अशा वेळी एअरप्लेन मोड ऑन केल्यास सर्व अडथळे थांबतात आणि तुम्ही तुमचे काम एकाग्रतेने पूर्ण करू शकता.
अनेकदा आपण अशा ठिकाणी असतो जिथे नेटवर्क खूप कमी असते. अशा वेळी फोन सतत सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे बॅटरी वेगाने संपते, अशा परिस्थितीत काही काळ एअरप्लेन मोड ऑन ठेवणे शहाणपणाचे ठरते.
जेव्हा तुम्ही मुलांना गेम खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी फोन देता, तेव्हा एअरप्लेन मोड नक्की ऑन करा. यामुळे मुले चुकून कोणाला कॉल करणार नाहीत किंवा इंटरनेटवरून काही अयोग्य मजकूर त्यांच्या समोर येणार नाही. तसेच गेममधील अनपेक्षित खरेदीपासूनही (In-app pur-chase) तुमचा बचाव होईल.
सार्वजनिक ठिकाणी तुमच्या फोनचा डेटा चोरीला जाण्याची किंवा ट्रॅकिंगची भीती असते. एअरप्लेन मोड ऑन केल्यामुळे फोन सर्व नेटवर्कपासून पूर्णपणे तुटतो, ज्यामुळे तुमचे लोकेशन आणि डेटा अधिक सुरक्षित राहतो..






