आसाम विधानसभा निवडणूक 2026 पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई भाजप प्रवेश झाला (फोटो - सोशल मीडिया)
देशांतील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूका या भाजपसाठी आव्हानत्मक ठरणार आहेत. या राज्यांवर राज्य करण्यासाठी भाजप साम-दाम-दंड-भेद करण्यास तयार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये राजकीय स्थित्यंतरे सुरू झाली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला. बोरदोलोई यांचा राजीनामा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे आणि भाजपसाठी मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
भारतीय जनता पक्षात सामील झाल्यावर बोरदोलोई म्हणाले की, त्यांना काँग्रेसमध्ये घुसमटल्यासारखे वाटत होते आणि त्यांनी पक्षावर आपला अपमान केल्याचा आरोपही केला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि केंद्रीय राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हे देखील वाचा: इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून ‘जग लाडकी’ सुखरूप मुंद्रा बंदरात; 80,886 टन कच्चे तेल भारतात दाखल
प्रद्युत बोरदोलोई यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
भाजपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच, प्रद्युत बोरदोलोई यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण स्पष्टपण सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेसमधील असमाधान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या कामाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. नवी दिल्लीत भाजपमध्ये औपचारिकपणे सामील झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सरमा यांची कार्यशैली त्यांना प्रभावित केले, ज्यामुळे त्यांनी हे महत्त्वाचे राजकीय पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काय म्हणाले?
पत्रकारांशी बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बोरदोलोई यांच्या पक्षांतराला एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हटले आणि हे काँग्रेस नेत्यांच्या पक्षांतराच्या व्यापक प्रवृत्तीचे द्योतक असल्याचे सांगितले. विरोधी पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “मी प्रद्युत बोरदोलोई यांचे भाजपमध्ये मनापासून स्वागत करतो. आज काँग्रेसमध्ये स्वाभिमानी लोकांना स्थान नाही.” येत्या काही महिन्यांत काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते भाजपमध्ये सामील होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
हे सुद्धा वाचा : Bihar New CM: बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे वारे: नितीश कुमारांनी दिले भावी मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुख्यमंत्री सरमा यांचा महत्त्वपूर्ण दावा
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, पुढील दोन वर्षांत देबब्रता सैकिया आणि रिपून बोरा यांच्यासारखे नेतेही भाजपमध्ये सामील होतील. “आसाम काँग्रेसमधील अनेक सक्षम नेते आमच्यात सामील होतील.” ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांच्या भाजपमध्ये सामील होण्याची प्रक्रिया २०१६ पासून सुरू असून, तिला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.






