दिवाळी पहाट 'स्वर दीपावली' 28 ऑक्टोबरला 'नवराष्ट्र'च्या कार्यक्रमात रंगणार गीतांची मैफल
लखलखत्या तेजाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीच्या प्रारंभी रसिकांसाठी ‘नवराष्ट्र’ने शब्दस्वरांची अनोखी मैफील आयोजित केली आहे. दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ‘दिवाळी पहाट’ म्हणजेच दिपोत्वादरम्यान सकाळ-सकाळ आयोजित होणारा कार्यक्रम. वर्षांपासून या कार्यक्रमाची परंपरा सुरु आहे. या दिवशी लोक सांस्कृतिक रुपाने एकत्र येत मराठी गीतांचा आनंद घेतात.
हा आनंद शहरातील लोकांना आणि दिवाळीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ‘नवराष्ट्र’तर्फे 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5.30 वाजल्यापासून नागपुरमधील सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये दिवाळी पहाट ‘स्वर दिवाळी’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय नैवेद्यम आणि पिरॅमिड आमरा आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, गीते, कविता, किस्से यांच्या माध्यमातून एकजुटतेचा आनंद साजरा करण्याच्या विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘दिवाळी पहाट’ सारख्या अनोख्या मैफलीत दिग्गज मराठीतील दिग्गज कलाकार समीर चौगुले, सोनाली कुलकर्णी, सलील कुलकर्णी, शरयू दाते आणि संकर्षण कऱ्हाडे आपल्या गीतांमधून लोकांना मंत्रमुग्ध करतील. या शहरातील लोकांना प्रत्येक दिवाळीत या कार्यक्रमांची प्रतीक्षा व उत्सुकता असते. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे.
दिवाळी पहाटमध्ये सकाळच्या वातावरणात मराठी कलाकारांसोबत एक अनोखी मैफल सजेल. या कार्यक्रमात गप्पांसह गाणे, कविता आणि किस्सेसुद्धा ऐकायला मिळतील. यातून संगीताची आपली संस्कृती जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘नवराष्ट्र’ आपल्या शहरातील लोकांसाठी नेहमीच असे अनोखे कार्यक्रम आयोजित करत असते.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. यामध्ये तुम्ही सुगम संगीताचा आनंद घ्याल, तर दुसरीकडे कथा, गप्पागोष्टींच्या माध्यमातून जगाचा सैरसपाटा करता येईल. सायंकाळच्या वेळी होणाऱ्या गप्पागोष्टी यावेळी सकाळी सकाळी होईल. तसेच एकाहून एक सरस गीतांमुळे सकाळचे वातावरण संगीतमय होईल. मराठी संगीतात संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळेल.
या कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांची दिवाळी खास ठरणार असतानाच संपूर्ण ऑक्टोबर महिना दिवाळी स्पेशल होणार आहे. या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तुमची सीट ‘बुक माय शो’ द्वारे बुक केली जाऊ शकते. त्यामुळे आता उशीर करू नका, लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि दिवाळी पहाटचा आनंद घ्या.
या कार्यक्रमाचे इम्युनिटी पार्टनर वैद्यनाथ आहेत. तर असोसिएट स्पॉन्सर आशीष एनएक्स, आदित्य अनघा, कुलकर्णी बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स, एचसीजी कॅन्सर केअर, पीपल लिंक, ईवायसी गारनेट मोटर्स, रॉयल बिल्डकॉन, विको, मुदलियार इलेक्ट्रॉनिक्स, अम्ब्रोसिया व निलावार साडी आहे. अधिक माहितीसाठी 7709355553 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.