International Everest Day: माउंट एव्हरेस्टच्या नावामागील इतिहास माहितीय का ? 'असे' पडले होते नाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जगभरात दरवर्षी २९ मे रोजी आंतरराष्ट्रीय एवरेस्ट दिन साजरा केला जातो. हा तोच दिवस जेव्हा न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी नेपाळचे आणि तेनझिंग नोर्गे शेर्पा यांनी पहिल्यांदा मांउट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई केली होती. याच स्मरणार्थ आज आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो. पूर्वी या मांऊट एव्हरेस्टला पीक-१५ म्हणून ओळखले जात होतो. पण १८६५ मध्ये याचे नाव बदलून एव्हरेस्ट ठेवण्यात आले. तसेच माऊंट एव्हरेस्टला आणखी वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते. भारत, नेपाळ आणि चीनशी या शिखराच्या नावाचा संबंध आहे. आज याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
12 दिवसांच्या पूर्वीच महाराष्ट्रात पावसाने केला कहर; मान्सूनचा हा फक्त ट्रेलर अन् टीझर?
तर जगातील सर्वा उंच शिखराला एव्हरेस्ट हे नाव ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरुन देण्यात आले होते. सर जॉर्ज एव्हरेस्ट हे मूळचे ब्रिटनमधील वेल्स येथील होते. त्यांचा जन्म ४ जुलै १७९० रोजी ब्रिटनध्ये होता. १८३० ते १८४३ च्या कालावधीत सुमारे १३ वर्षे त्यांनी भारताचे सर्वेयर जनरल म्हणून काम केले.
या काळात भारतासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने भारतानेच सर्वेक्षण केले. यामुळे हिमालयातील शिखरांचे मोजमापे करणे शक्य झाले. १ डिसेंबर १८६६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कामगिरीमुळे जगातील सर्वात उंच शिखराला एव्हरेस्ट हे नाव देण्यात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी कधीही शिखरावर चढाई केली नव्हती.
सर जॉर्ज एव्हरेस्ट हे अतिशय सामान्य कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे रॉयल मिलिटकी कॉलेमधून शिक्षण झाले. त्यांनी अभियांत्रिकी आणि गणिताचा सखोल अभ्यास केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि समाजाच्या सेवेतसाठी दिले.
माऊंट एव्हरेस्टला पूर्वी स्थानिक लोक ‘सागरमाथा’ या नेपाळी नावाने ओळखले जात होते. तसेच ‘चोमोगुंमा’ या तिबेटी नावाने देखील माऊंट एव्हरेस्टची ओळख होती. त्यानंतर १८६५ मध्ये एव्हरेस्ट हे नाव देण्यात आले. त्यावेळी जॉर्ज एव्हरेस्ट यांनी याला विरोध केला होता. त्यांच्या मते शिखराचे नाव स्थानिक भाषेत असायला हवे. पण त्यांचे उत्तराधिकारी सर अँड्र्यू वॉह यांनी १८५६ मध्ये एव्हरेस्ट नावाचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव रॉयल जिओग्राफितल सोसायटीने १८६५ मध्ये मंजूर केला.
आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा करण्यास २००८ पासून सुरुवात झाली. सर हिलपी यांच्या निधनानंतर नेपाळ सरकाने त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २९ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस म्हणून घोषित केला.
भारतीय सैन्याने सुरु केली भविष्यातील ‘युद्धाची’ तयारी सुरू; नवीन ड्रोन योद्धे होत आहेत तयार